IPL 2022, MI vs RR: तिलक वर्माचा षटकार, चेंडू थेट कॅमेरामनच्या डोक्यावर आदळला, पाहा Video

राजस्थान रॉयल्सने शनिवारी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 23 धावांनी पराभव केला. जॉस बटलरच्या दमदार शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र मुंबईने निर्धारीत 20 षटकात केवळ 170 धावा केल्या.

IPL 2022, MI vs RR: तिलक वर्माचा षटकार, चेंडू थेट कॅमेरामनच्या डोक्यावर आदळला, पाहा Video
Tilak Varma Hits Cameraman With His SixImage Credit source: BCCI / IPL
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 12:41 PM

मुंबई: राजस्थान रॉयल्सने शनिवारी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 23 धावांनी पराभव केला. जॉस बटलरच्या दमदार शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र मुंबईने निर्धारीत 20 षटकात केवळ 170 धावा केल्या. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय तर मुंबईचा सलग दुसरा पराभव आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना दोन विजय मिळवले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत दुसरा कुठलाही संघ प्रथम फलंदाजी करताना जिंकलेला नाही. या विजयासह राजस्थानच्या खात्यात आता चार गुण जमा झाले आहेत. राजस्थानने हा सामना जिंकला असला तरी मुंबईच्या एका युवा खेळाडूने राजस्थानच्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. या युवा खेळाडूच्या फलंदाजीच्या वेळी मैदानावर एक मोठा अपघात होता होता टळला, मात्र काही वेळ सर्वजण चिंतेत होते.

मुंबईचा युवा खेळाडू तिलक वर्माने या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. सामन्यादरम्यान तिलकने एक षटकार लगावला आणि हा चेंडू थेट मैदानावरील कॅमेरामनच्या डोक्यावर जाऊन आदळला. कॅमेरामनच्या डोक्याला चेंडू लागताच सीमारेषेवर उभा असलेला ट्रेंट बोल्ट चिंतेत पडला आणि तो त्याच्याकडे गेला. बोल्टने त्याची विचारपूस केली. सुदैवाने कॅमेरामनला गंभीर दुखापत झाली नाही. क्रिकेटमध्ये लेदर बॉलचा वापर केला जातो, या चेंडूचं वजन जवळपास 165 ग्रॅम इतकं असतं. असा चेंडू डोक्याला लागणं जीवघेणं ठरु शकतं. पण यावेळी सुदैवाने कोणतीही गंभीर घटना घडली नाही.

12 व्या षटकात कॅमेरामनच्या डोक्याला चेंडू लागला. राजस्थानचा फिरकीपटू रियान परागच्या पाचव्या चेंडूवर तिलक वर्माने लाँग ऑफवर षटकार ठोकला. कॅमेरामन आपले काम करत असतानाच चेंडू सरळ त्याच्या डोक्याला लागला. यावेळी चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या, पण ज्याने ही घटना पाहिली तो नक्कीच हादरला असेल. कारण मैदानावर यापूर्वी अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत.

बोल्टने मनं जिंकली

हा अपघात झाला तेव्हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत उभा होता. चेंडू कॅमेरामनच्या डोक्याला लागताच बोल्टने जखमी कॅमेरामनची प्रकृती विचारली. कॅमेरामनने त्याला सांगितले की तो ठीक आहे, पण बोल्टने लगेचच मॅच अधिकाऱ्यांना बोलावून कॅमेरामनवर उपचार करण्यास सांगितले.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

CSK vs PBKS Live Streaming : आज चेन्नई विरुद्ध पंजाबचा सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

IPL 2022 points table : राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवरील आंद्रे ‘राज’ 24 तासांंत गेलं, ईशानने हिसकावली ऑरेंज कॅप, बटलर दुसऱ्या स्थानी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.