कोलकाता नाइट रायडर्सचा नवीन कॅप्टन श्रेयस अय्यर यंदा ऑरेंज कॅप मिळवू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये त्याने 174.35 च्या सरासरीने एकूण 204 धावा केल्या.
विराट कोहलीचा सध्या फलंदाजी करताना संघर्ष सुरु आहे. डिसेंबर 2019 पासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकवता आलेले नाही. आता फाफ डू प्लेसिसकडे RCB चे कर्णधारपद आहे. त्यामुळे कोहलीवर कुठलाही दबाव नसून तो आता पूर्वीसारख्या फलंदाजीचं 'विराट' रुप दाखवू शकतो.
मधल्याफळीत खेळणारा सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सामन्यांमध्ये त्याने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर राहू शकतो. सामना फिनिश करण्याची त्याची क्षमता आहे.
डेविड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. त्याने स्वबळावर अनेकदा संघाला सामने जिंकून दिलेत. आक्रमक डावखुरा फलंदाज अशी त्याची ओळख आहे. रिकी पाँटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तो चौथ्यांदा आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवण्याचा प्रयत्न करेल.
केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. तो आधी पंजाब किंग्सकडून खेळायचा. आयपीएलमध्ये त्याने सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. 2020 च्या सीजनमध्ये त्याने ऑरेंज कॅप मिळवली होती. यंदाच्या मोसमात संघासाठी खोऱ्याने धावा करुन करीयरमध्ये दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.