IPL 2023, PBKS vs KKR | कोलकाताने टॉस जिंकला, नव्या कॅप्टनचा मोठा निर्णय

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. कोलकाताने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023, PBKS vs KKR | कोलकाताने टॉस जिंकला, नव्या कॅप्टनचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 3:45 PM

मोहाली | आयपीएल 16 व्या मोसमालीतल पहिल्या डबल हेडरचं आज (1 एप्रिल) आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकला आहे. कर्णधार नितीश राणा याने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.  कर्णधार म्हणून नितीश राणा याचा हा पहिलाच सामना आहे. तर नितीशसमोर पंजाबचा अनुभवी कर्णधार शिखर धवन याचं आव्हान असणार आहे.  यामुळे आता कर्णधार म्हणून नवखा नितीश धवनच्या अनुभवाचा कसा सामना करतो, याकडे कोलकाताचं लक्ष असणार आहे. नितीशला कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर याच्या जागी कर्णधार करण्यात आलं आहे. श्रेयसला बॅक इंज्युरीमुळे या मोसमातून बाहेर पडावं लागलं. श्रेयसला बॅक इंज्युरीमुळे या मोसमातून बाहेर पडावं लागलं.

मोहालीतील 10 सामन्यांमधील निकाल

मोहालीत आयपीएलमध्ये 2018 पासून ते आतापर्यंत एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. या 10 पैकी 4 वेळा पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर दुसऱ्या डावात 6 वेळा विजयी आव्हानाचं पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झालाय.

नितीशचा फिल्डिंग करण्याचा निर्णय अचूक?

कोलकाताने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला.नितीशचा हा निर्णय योग्य असल्याचं या मैदानातील गेल्या 10 सामन्यांमधील निकालावरुन सिद्ध होतं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दोन्ही संघातील परदेशी खेळाडू

दरम्यान पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू आहेत. कोलकातामध्ये सुनील नरेन, आंद्रे रसेल, टीम साऊथी आणि रहमानुल्लाह गुरबाज हे आहेत. तर पंजाब किंग्समध्ये भानुरा राजपक्षे, सॅम करण, नॅथन एलिस आणि सिंकदर रझा या चौघांचा समावेश आहे.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, नॅथन एलिस, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, मनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टीम साउथी, अनुकूल रॉय, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.