IPL 2023, GT vs CSK | गुजरात टायटन्सने टॉस जिंकला, अशी आहे प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात गुजराच टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत.

IPL 2023, GT vs CSK | गुजरात टायटन्सने टॉस जिंकला, अशी आहे प्लेइंग इलेव्हन
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 7:43 PM

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील ग्रँड ओपनिंग कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यानंतर सलामीच्या सामन्याला सुरुवात होत आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना होणार आहे. या सामन्याआधी गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आहे. गुजरात टायटन्सने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

2 खेळाडूंचं आयपीएल पदार्पण

चेन्नईकडून मराठमोळ्या राजवर्धन हंगरगेकर आणि गुजरातकडून जोशुआ लिटील अशा या दोघांचं या सामन्याच्या निमित्ताने पदार्पण झालं आहे. तर केन विलियमसन याचं गुजरातसाठी डेब्यू ठरलंय.

चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 मराठी खेळाडू

चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋतुराज गायकवाड आणि राजवर्धन हंगरगेकर या 2 मराठी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

चेन्नईमध्ये 5 ऑलराउंडर्स

चेन्नईच्या गोटात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये मोईल अली, रविंद्र जडेजा शिवम दुबे, बेन स्टोक्स आणि मिचेल सँटनर अशा तगड्या अष्टपैलू खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हमध्ये समावेश आहे. त्यामुळे या 5 जणांचं मजबूत आव्हान हे गुजरातसमोर असणार आहे.

अहमदाबादमधील गेल्या 20 सामन्यांचा निकाल

अहमदाबादमधील या स्टेडियममध्ये गेल्या 20 टी सामन्यांमध्ये 7 वेळा पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर विजयी आव्हानाचं पाठलाग करताना 13 वेळा विजय झाला आहे.

हेड टु हेड आकडेवारी

गुजरात विरुद्ध चेन्नई आतपर्यंत एकूण 2 वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने चेन्नईवर विजय मिळवला आहे. गुजरातने 2022 मध्ये चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 3 विकेट्स विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने चेन्नईला पराभूत केलं होतं.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.