IPL 2023 | आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?

आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीरझालं आहे. जाणून घ्या पहिल्या सामन्यात कोण भिडणार?

IPL 2023 | आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
IPL 2023
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 6:27 PM

मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.  आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात 15 व्या मोसमात चॅम्पियन राहिलेल्या गुजरात टायटन्सचा सामना हा आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम चेन्नई विरुद्ध होणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात रविवारी 21 मे रोजी गुजरात विरुद्ध बंगळुरु आमनेसामने असणार आहेत.

यंदाच्या 16 व्या मोसमात एकूण 74 साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहे. या 74 सामन्यांचं आयोजन हे 12 स्टेडियममध्ये तरण्यात आलं आहे. तसेच 3 वर्षांनी पहिल्यांदा प्रत्येक टीम आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयपीएल 2023 चं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सामन्यांच्या आयोजनाचा मान हा यंदा गुवाहाटी आणि धर्मशालाला मिळाला आहे. त्यामुळे आता अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला इथे सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आयपीएलच्या या 16 व्या हंगामात क्रिकेट चाहत्यांना आणखी थरार पाहायला मिळणार आहे. कारण या पर्वासाठी 23 डिसेंबर 2022 ला मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये प्रत्येक फ्रँचायजीने आपल्यानुसार खेळाडूंची निवड केली. त्यामुळे पुन्हा खेळाडू या संघातून त्या संघात गेले आहेत.

आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.

ग्रुप ए मधील टीम

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स.

ग्रुप बी टीम

चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स

सॅम करन महागडा खेळाडू

दरम्यान इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोचीत पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने सॅमसाठी 18 कोटी 50 लाख रुपये मोजले. त्यामुळे सॅम या 16 व्या हंगामात कशी कामगिरी करतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.