IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा स्पीड 140 किमी प्रतितास होणार, न्यूझीलंडचा पोलिसवाला करणार जादू!

Mumbai Indians Arjun Tendulkar : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची स्थिती सध्यातरी वाईट आहे. उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करून सुपर फोरमध्ये स्थान मिळवायचं आहे. अशात मुंबईची गोलंदाजी आणखी प्रभावी होणं गरजेचं आहे.

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा स्पीड 140  किमी प्रतितास होणार, न्यूझीलंडचा पोलिसवाला करणार जादू!
IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीला मिळणार वेग, न्यूझीलंडच्या पोलिसवाल्याने घेतली हमीImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 6:32 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने दोन वर्षांनंतर पदार्पण केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा असला तरी सध्या अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यानंतर अर्जुन तेंडुलकर चांगली गोलंदाजी करत आहे. पण पंजाब विरुद्धच्या सामन्यात 31 धावा दिल्याने टीकेचा धनीही ठरला आहे. अर्जुन तेंडुलकरने 4 सामन्यात 3 गडी बाद केले आहेत. यॉर्कर आणि बाउंसरने अर्जुन तेंडुलकरने लक्ष वेधून घेतलं आहे. पण गोलंदाजीचा वेग कमी असल्याने कमकुवत बाजू समोर आली आहे. आता त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्याची जबाबदारी न्यूझीलंड पोलिसवाल्याने घेतली आहे.

अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्याची जबाबदारी

अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग कमी असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी गोलंदाजीचा वेगही तितकाच महत्त्वाचा आहे. अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा वेग 120 ते 130 किमी प्रतितास या दरम्यान आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते, यश मिळावयचं असेल तर गोलंदाजीचा वेग वाढवणं गरजेचं आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजी वेग वाढवण्याची जबाबदारी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज शेन बाँडने घेतली आहे. शेन बाँड मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. क्रिकेट विश्वात वेगवान गोलंदाजी करणारा शेन बाँड क्रिकेटर होण्यापूर्वी न्यूझीलंड पोलिसात नोकरी करत होता.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यानंतर शेन बाँडला अर्जुनच्या गोलंदाजीबाबत प्रश्न विचारण्यात आले. गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडने सांगितलं की, “अर्जुनचा वेग वाढवण्याची गरज आहे. मी त्याच्या वेगासाठी प्रयत्न करणार आहे. पण आतापर्यंतच्या कामगिरीने संघ आणि मी खूश आहोत.”

मुंबई इंडियन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये 4 सामने खेळला आहे. यात त्याच्या खात्यात 3 विकेट्स पडल्या आहेत. गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्याने दुसऱ्या षटकातच वृद्धीमान साहाला बाद केलं. त्याला फक्त दोन षटकं दिली. त्यात त्याने 9 धावा देत 1 गडी बाद केला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात 31 धावा दिल्यानंतर त्याने जोरदार कमबॅक केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.