IPL 2023 Video : अर्जुन तेंडुलकरच्या तोंडून निघाले कॅमेरामनबाबत अपशब्द? व्हायरल Video मुळे नेटकऱ्यांची चर्चा
IPL 2023 MI vs SRH : सनराईजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शेवटचं षटक अर्जुन तेंडुलकरने चांगल्या पद्धतीने हाताळलं. तसं पाहिलं 6 चेंडूत 20 धावा करणं आयपीएलमध्ये तरी सोपं आहे. पण अर्जुनने ते शिवधनुष्य पेललं. पण असं असलं तरी अर्जुन एका वेगळाच कारणाने चर्चेत आहे.
मुंबई : अर्जुन तेंडुलकर हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा असल्याने त्याच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. असं असलं तरी अर्जुन तेंडुलकरने आपल्या मेहनतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये पाय रोवत आहे. गेल्या दोन सिझनपासून डगआऊटमध्ये बसलेल्या अर्जुनला यंदा संधी मिळाली. दोन सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शेवटचं शतक व्यवस्थितरित्या टाकत क्रीडारसिकांची मनं जिंकली. 20 धावा आवश्यक असताना अवघ्या पाच धावा देत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. इतकंच काय तर आयपीएलमधील पहिल्या विकेटची नोंदही केली. इतकी चांगली कामगिरी केल्यानंतरही अर्जुन एका वेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी वेळचा आहे. यात अर्जुन तेंडुलकर डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. तेव्हा कॅमेरामन त्याला स्क्रिनवर दाखवतो. यानंतर अर्जुन रागात सहकाऱ्याकडे आपला भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओतील लिप सिंकवरून सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
— Tirth Thakkar (@ImTT01) April 18, 2023
I too saw him uttering just BC
— Kartik Kannan (@kartik_kannan) April 18, 2023
Did Arjun Tendulkar say, "Mujhe jaan much kar dikhate BC" when the camera pointed at him? ?
— Sameer Allana (@HitmanCricket) April 18, 2023
एका युजर्सने लिहिलं आहे की, “मी अर्जुनला अपशब्द बोलताना पाहिलं.” तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, “जेव्हा कॅमेरा अर्जुनकडे गेला तेव्हा त्याने सांगितलं की हे लोकं मला जाणूनबुजून दाखवतात.”
हैदराबाद विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सने 14 धावांनी जिंकला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 192 धावा केल्या. हैदराबादचा संघ 19.5 षटकात सर्वबाद 178 धावाच करू शकला.
अर्जुन तेंडुलकर याची पहिली प्रतिक्रिया
“मला आयपीएलमध्ये पहिली विकेट मिळाली. मला ओव्हर टाकण्यासाठी बॉल दिल्यानंतर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. मला गोलंदाजी आवडते, कॅप्टनने मला बॉलिंग करण्यास सांगितले. तेव्हा मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि तसंच झालं. सचिन तेंडुलकर आणि मी क्रिकेटबद्दल बोलतो, आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो. मी फक्त चेंडू टाकण्यावर लक्ष केंद्रित केलं.”, अशी प्रतिक्रिया अर्जुनने सामन्यानंतर दिली.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शौकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.