मुंबई : आयपीएल 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या 16 व्या हंगामात एकूण 10 संघ सहभागी होणार आहे. या 10 संघांचं प्रत्येकी 5 यानुसार एकूण 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र त्याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. धोनीच्या निवृत्तीची तारीख ठरली आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळतो. त्यामुळे चाहते धोनीला आयपीएलमध्ये पाहण्यासाठी उत्सूक असतात. पण आता निवृत्तीची बातमी आल्याने चाहत्यांचा हिरमोड झालाय.
धोनी आयपीएलमधील शेवटचा सामना हा 14 मे रोजी खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, कॅप्टन धोनी याचा हा आयपीएलमधील अखेरचा मोसम असणार आहे. तर धोनी आपल्या आयपीएल कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 14 मे ला खेळणार आहे.
चेन्नईचा 14 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध हा सामना होणार आहे. चेन्नईचा हा त्यांच्या कोट्यातील 13 वा सामना आहे. तर चेन्नई मोसमातील सलामीचा सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 31 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 234 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 4 हजार 978 धावा केल्या आहेत. यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने 229 गगनचुंबी सिक्स ठोकले आहेत.
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.