M S Dhoni | चेन्नईला चॅम्पियन करण्यासाठी धोनी सज्ज, कॅप्टन कूलचं जोरात स्वागत
आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात ही 31 मार्चपासून होत आहे. या मोसमासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला अवघे काही दिवस शिल्ल राहिले आहेत. आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात ही 31 मार्चपासून होत आहे. एकूण 10 फ्रँचायजीने या स्पर्धेच्या हिशोबाने तयारी सुरु केली आहे. या आगामी मोसमासाठी आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स शुक्रवार 3 मार्चपासून सरावाला सुरुवात करणार आहे. या सराव शिबिरासाठी चेन्नईचा कर्णधार ‘कॅप्टन कूल’ अर्थात महेंद्रसिंह धोनी, अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे चेन्नईत दाखल झाले आहेत.
धोनी चेन्नईच्या एअरपोर्टवर पोहचताच त्याचं एका हिरोप्रमाणे स्वागत करण्यात आलं. धोनी धोनी असा जयघोष करण्यात आला. धोनीच्या या स्वागताचे फोटो आणि व्हीडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
धोनी चेन्नईत दाखल
Thala Dharisanam, finally! ?#DencomingDay pic.twitter.com/rQpinM3vrZ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2023
पहिला सामना केव्हा?
चेन्नई या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 31 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलमधील यशस्वी टीम
चेन्नई आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम आहे. चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. कॅप्टन धोनीने चेन्नईला आपल्या नेतृत्वात 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे धोनीने आपल्या चाहत्यांना हटके गिफ्ट म्हणून पुन्हा एकदा चॅम्पियन करुन गोड शेवट करावा, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.
ग्रुप ए मधील टीम
मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स.
ग्रुप बी टीम
चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स
आयपीएल 2023 साठी टीम सीएसके
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.