MS Dhoni | “कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी IPL मधून रिटायर..”

महेंद्रसिंह धोनी हा आतापर्यंत सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. त्याने टीम इंडियाला आणि आयपीएलमध्ये चेन्नईला चॅम्पियन केलं आहे.

MS Dhoni | कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी IPL मधून रिटायर..
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 9:15 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला अवघे काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीची सामना हा गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स आयपीएल स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. मात्र या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नक्की काय झालंय हे आपण जाणून घेऊयात.

बातमी आहे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीबाबतची. ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर मॅथ्यू हेडनने धोनीच्या निवृत्तीचा धागा धरुन प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई यंदा आगामी मोसमाचं सेलिब्रेशन हे शानदार पद्धतीने करणार आहे. महेंद्रसिंह धोनी याचा आयपीएल टी 20 स्पर्धेत खेळाडू म्हणून हा शक्यतो शेवटचा मोसम असणार आहे, असं हेडन म्हणाला.

हेडन काय म्हणाला?

“सीएसकेच्या यशासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा शोध घेण्याच यशस्वी राहिली आहे. चेन्नई 2 मोसमात स्पर्धेतून बाहेर राहणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे. पण त्यातून कमबॅक करत चेन्नईने आयपीएल ट्रॉफी जिंकली, ज्याची कुणाला आशा नव्हती. धोनीची टीमला मजबूत करणं, संघात सुधारणा करण्याची एक वेगळी शैली होती. मात्र टीम मॅनेजमेंटचा काही खेळाडूंवर विश्वास बसला होता, कारण त्या खेळाडूंना टीम मॅनेजमेंटने कायम ठेवलं होतं.”, असं हेडन म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“धोनीसाठी मला वाटतं की हा वर्ष खास असेल तसेच तो याचं सेलिब्रेशन करेल. मला वाटतं की धोनी युगाचा अंत होईल. धोनी आपल्या चाहत्यांसाठी त्याच्या स्टाईलने निरोप घेईल. तसेच सीएसकेचे चाहतेही धोनीलाही त्याच्या स्टाईलने शेवट करताना पाहू इच्छितील.”, असं हेडनने स्पष्ट केलं.

“धोनी नक्कीच शेवटच्या वेळेस चेपॉक स्टेडियमवर आपल्या चाहत्यांना अलविदा म्हणले. या क्षणाला विसरता येणार नाही. तुम्ही विचार ही करु शकणार नाही की त्यावेळेस स्टेडियममध्ये किती जण पोहचतील.”,असं हेडनने सांगितलं.

आयपीएलमधील यशस्वी कर्णधार बातमी

धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.

धोनीची आयपीएल कारकीर्द

धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 234 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 4 हजार 978 धावा केल्या आहेत. यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने 229 गगनचुंबी सिक्स ठोकले आहेत.

आयपीएल 2023 साठी टीम सीएसके

महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.