Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Tushar Deshpande | ‘रोहित शर्मा याला आऊट करणं एकदम सोपं, विराट एबीसारखं नाही’, ‘त्या’ विधानावर तुषार देशपांडेने सोडलं मौन!

सामन्यानंतर तुषार देशपांडेचं कथित वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं होतं. मात्र त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी त्याला फैलावर घेतलं. अशातच यावर तुषारने इन्स्टा स्टोरी ठेवत स्पष्टीकरण दिलं आहे. 

IPL 2023 : Tushar Deshpande | 'रोहित शर्मा याला आऊट करणं एकदम सोपं, विराट एबीसारखं नाही', 'त्या' विधानावर तुषार देशपांडेने सोडलं मौन!
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 7:11 PM

मुंबई :  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधील झालेला सामना एकतर्फी झालेला पाहायला मिळाला. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने सात विकेट्स ने मुंबईवर विजय मिळवला होता. या सामन्यात मुंबईची फलंदाजी ढेपाळलेली दिसली. चेन्नईचा बॉलर तुषार देशपांडे याने कर्णधार रोहित शर्माला बोल्ड केलं होतं, त्याचा खतरनाक आउट स्विंग समजण्यात रोहित पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. मात्र या सामन्यानंतर तुषार देशपांडेचं कथित वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं होतं. मात्र त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी त्याला फैलावर घेतलं. अशातच यावर तुषारने इन्स्टा स्टोरी ठेवत स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमंक कोणतं वक्तव्य होतं?

रोहित शर्माला आऊट करणं सोपं आहे. तितकं विराट कोहली आणि एबी डिव्हिलयर्स यांना नाही, अशा  प्रकाराचं वक्तव्य तुषार देशपांडे याने केल्याचे कोट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र यावर आता तुषारने मौन सोडलं असून स्टोरीमध्ये स्क्रीन शॉट शेअर करत फेक न्यूज असल्याचं त्याने सांगितलं आहे.

काय म्हणाला तुषार देशपांडे?

मला सर्व दिग्गज खेळाडूंचा आदर असून मी अशा प्रकराचं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं तुषारने म्हटलं आहे. मात्र यावरून तुषारला सोशल मीडियावर रोहितच्या चाहत्यांनी भरपूर प्रमाणात ट्रोल केलं. युवा खेळाडूसाठी ही चांगली गोष्ट नाही. तुषारने हाय व्होल्टेज सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार असलेल्या रोहितला बाद करत सुरूंग लावला होता.

Tushar Deshpande

मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या होत्या. मुंबईकडून 32 धावांची सर्वाधिक खेळी ईशान किशन यांनी केली होती. तर शेवटला ऋतिकने 18 धावांची खेळी करत संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला होता. मुंबईने दिलेलं आव्हान चेन्नईने 19 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केलं. अजिंक्य रहाणेने केल्या 61 धावांच्या स्फोट खेळीच्या जोरावर चेन्नईने हा सामना जिंकला. त्यासोबतच ऋतुराज गायकवाड यांने नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.