IPL 2023 CSK vs DC : जडेजा आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं? चोरटी धाव घेतल्यानंतर तलरबाजीने उत्तर Watch Video

आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरातनंतर चेन्नई सुपर किंग्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. चेन्नईनं दुसऱ्या स्थानीच ठाण मांडल्याने आता चेन्नई विरुद्ध गुजरात असा सामना प्लेऑफमध्ये होणार आहे.

IPL 2023 CSK vs DC : जडेजा आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं? चोरटी धाव घेतल्यानंतर तलरबाजीने उत्तर Watch Video
IPL 2023 CSK vs DC : जडेजा आणि वॉर्नरमध्ये धाव घेण्यावरून असा रंगला सामना, तलवारबाजी करत दिलं उत्तर Watch Video
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 7:39 PM

मुंबई : आयपीएल 2023 प्लेऑफच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण सामन्यात चेन्नईने दिल्लीला 77 धावांनी पराभूत केलं. या विजयासह चेन्नई प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं आहे. चेन्नईने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. 20 षटकात 3 गडी गमवून 223 धावा केल्या आणि विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 146 धावा करू शकला. 17 गुणांसह चेन्नईचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे लखनऊने सामना जिंकला तरी तिसऱ्या स्थानीच राहील. त्यामुळे गुजरात विरुद्ध चेन्नई हा सामना 23 मे रोजी रंगणार आहे. हा सामना दिल्लीने गमवला असला तरी सामन्यामध्ये एक क्षण वेगळंच चित्र पाहायला मिळालं. डेविड वॉर्नरने चोरटी धाव घेतल्यानंतर जडेजासोबत जुगलबंदी पाहायला मिळाली.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाचं पाचवं षटक दीपक चाहरला सोपवलं. पहिल्या चेंडूवर वॉर्नर षटकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडूवर वॉर्नरने पुन्हा प्रहार करत चौकार मारला. त्यानंतर चेंडूवर वॉर्नर फटका मारला आणि मोईन अलीच्या हातात चेंडू असताना धाव घेतली. पण स्टम्पला चेंडू लागला नाही आणि थेट अजिंक्य रहाणेच्या हातात गेला.

अजिंक्य रहाणेच्या हातात चेंडू असताना वॉर्नरने त्याला डिवचण्याच्या हेतूने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजिंक्यने जोरात चेंडू स्टम्पवर फेकला. हा चेंडू रवींद्र जडेजाच्या हाती आला. त्यानंतर तू धाव घे मी स्टम्पवर मारतो असं चित्र होतं. तितक्यात वॉर्नरने रवींद्र जडेजाच्या स्टाईलने तलवारबाजी केली. त्याची कृती पाहून जडेजाला हसू आवरलं नाही.

डेविड वॉर्नरने चेन्नईने दिलेल्या धावा पूर्ण करण्यासाठी जबरदस्त खेळी केली. त्याने 58 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याच्यासोबत एकही फलंदाज जास्त काळ टिकू शकला नाही

दोन्ही संघाचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसोव, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.