मुंबई : सीएसके संघाने फायनल सामना जिंकत इतिहास रचला, रविंद्र जडेजाने केलेल्या सुपर फिनिशिंगनंतर सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळाला. आयपीएलच्या इतिहासामध्ये तीन दिवस चाललेल्या फायनलमध्ये सीएसके संघाने बाजी माारली. मात्र या सगळ्यात गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याच्या स्पेलला सर्वजण विसरले. शेवटचे दोन चेंडू सोडले तर त्याने सीएसकेच्या हातातून सामना काढून घेतला होता. 2015 चा वर्ल्ड कप खेळणारा मोहित गेली 8 वर्षे कुठेच दिसला नाही, यंदा तो चांगलाच चर्चेत आला. कारण यामागे त्याने केलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं मात्र दोन बॉलमुळे सगळ्यावर पाणी फेरलं.
IPL 2022 च्या पर्वामध्ये मोहित शर्मा गुजरात टायटन्सचा नेट बॉलर होता. यंदाच्या मोसमात मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. 14 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या, पर्पल कॅपच्या रेसमध्ये मोहम्मद शमीनंतर तो दुसऱ्या स्थानी राहिला. या मोसमामध्ये मोहितने खऱ्या अर्थाने डेथ ओव्हर्समध्ये ज्या प्रकारची गोलंदाज हवी असते तशी केली.
मोहितने प्ले-ऑफमधील मुंबई इंडिअन्सविरूद्धच्या सामन्यात 5 विकेट्स घेत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद या दोन प्रमुख विकेट घेत संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्येसुद्धा त्याने 3 विकेट्स घेतल्या.
अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू आणि महेंद्र सिंग धोनी यांना माघारी पाठवत सामना गुजरात्या बाजूने खेचला होता. मोहितने त्याआधीच्या ओव्हरमध्ये रायडू आणि धोनीला शून्यावरच आऊट करत सीएसके संघाला जबरदस्त धक्के दिले होते.
शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूंमधील काही एकदम कडक यॉर्कर टाकले. ज्यावर दुबे आणि जडेजा यांना मोठा फटका खेळू दिला नाही. दोन चेंडूत 10 धावा हव्या असताना पंड्या मोहितला पाणी घेऊन गेला चर्चा करून माघारी गेला.
दरम्यान, या लहान्या ब्रेकने मोहितने पकडलेली लेंथ बिघडली. कारण दोन्ही फलंदाजांना चेंडू हवे तसे कनेक्ट झाले नव्हते. दोन बॉल राहिल्यावर पंड्या आणि मोहित काहीसा निवांत झाला. मात्र त्यानंतर जडेजाने सिक्स आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर मोहितला हार्दिकने मिठी मारत त्याचं सांत्व केलेलं दिसलं, कदाचित जर चार चेंडूनंतर दोन चेंडूंसाठी वेळ न घेता ते बॉलसुद्धा त्याने टाकून घेतले असते तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असू शकता.