Vaibhav Arora Dhoni | वैभव अरोरा याच्या बॉलिंगवर महेंद्रसिंह धोनी क्लिन बोल्ड, पण..
कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या युवा आणि नवख्या वैभव अरोरा याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला क्लिन बोल्ड केला. पण पुढे काय झालं?
तामिळनाडू | चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाईट रायडर्स टीमसमोर आपल्या घरच्या मैदानात एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पाणी भरताना दिसून आली. चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय चुकीचा ठरला. केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत चेन्नईला 20 ओव्हरमध्ये अवघ्या 144 धावांवर रोखलं. त्यामुळे केकेआरला 145 धावांचं आव्हान मिळालं. केकेआरने चेन्नईला ठराविक अंतराने झटके दिले. मात्र त्यानंतर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा या जोडीने चेन्नईचा डाव सावरला.
शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर रविंद्र जडेजा 20 धावांवर आऊट झाला. वैभव अरोरा याने जडेजाला सामन्यातील 20 व्या आपल्या कोट्यातील चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर आऊट केलं.
जडेजा आऊट झाल्यानंतर मैदानात एकच माहोल तयार झाला. कारण आता मैदानात येणार होता कॅप्टन आणि सीएसकेचा दत्तकपुत्र महेंद्रसिंह धोनी. धोनीने मैदानात येताच एकच जल्लोष सुरु झाला. आता शेवटचे 2 बॉल होते. धोनीकडून 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. धोनीसमोर नवखा वैभव अरोरा होता, त्यामुळे चाहत्यांच्या आशा आणखी वाढल्या.
अरोराने धोनीला पाचवा बॉल टाकला. मात्र तो बॉल वाईड होता. त्यामुळे धोनीला मोठा फटका मारण्याची आणखी एक संधी मिळाली. अरोराने पुन्हा बॉल टाकला. पण आता हा नो बॉल होता. त्यामुळे धोनीला फ्री हीट मिळाला.
फ्री हीट म्हणजेच हात खोलून मोठा फटका मारण्याची बिनशर्त परवानगी, ना आऊट होण्याची भीती न आणखी काही. धोनी आता फटका मारेल, अशी आशा होती. पण कसलं काय, वैभव अरोराने धोनीला क्लिन बोल्ड केलं.
धोनी क्लिन बोल्ड
Match koi Bhi Jeete Main Yahi Jeet Gai ?? 4 Din ke Bache ne bowled mara ❤️
Well Bowled Vaibhav Arora #CSKvKKR #KKRvCSK pic.twitter.com/ubYTxZeRGP
— ? it's A Girl ? (@aajkiladkii) May 14, 2023
आता हा फ्रिट असल्याने धोनी वाचला. महत्वाची गोष्ट म्हणजे हा बॉल डॉट पडला. आता शेवटच्या बॉलवर धोनीने फटका मारेल, अशी आशा होती. पण इथे धोनीने निराशा केली. पण धोनीने 2 धावा घेत चेन्नईचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 144 पर्यंत पोहचवला. धोनीने 3 बॉलमध्ये 2 धावा केल्या.
तर वैभव अरोरा याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 30 धावा देत निर्णायक क्षणी 1 पण रविंद्र जडेजाची विकेट घेतली. विशेष म्हणजे दुबे, जडेजा आणि धोनी या 3 विस्फोटक फलंदाजांसमोर वैभवने ही 20 वी ओव्हर टाकली. पण अरोराने या ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा दिल्या. त्यामुळे वैभवचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.
केकेआरची डेथ ओव्हरमध्ये कमाल
Shardul Thakur in 19th over:
•0,1,1,1,WD,0,1 (5 runs) vs Dube & Jadeja.
Vaibhav Arora in 20th over:
•2,1,2,W,WD,N,0,2 (9 runs) vs Dhoni, Jadeja & Dube.
Incredible, Shardul & Vaibhav! pic.twitter.com/jKJhw6Un98
— vinay sublaniya (@SublaniyaVinay) May 14, 2023
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.