IPL 2023 : CSK vs RR | महेंद्र सिंह धोनीचे सिक्स, शेवटच्या ओव्हरचा संपूर्ण थरार, पाहा Video
संदीप शर्माच्या परफेक्ट यॉर्करमुळे हा सामना चेन्नईला चेन्नईच्या हातून सुटला. शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय झालं? त्याओव्हरमधील सर्व थरार खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये पाहा.
मुंबई : सीएसके आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या थरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अवघ्या 3 धावांनी निसटता विजय झाला. राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची दमछाक झालेली पाहायला मिळाली. मात्र शेवटला येत महेंद्रसिंग धोनीने तुफानी खेळी करत सामना जवळखेचला. संदीप शर्माच्या परफेक्ट यॉर्करमुळे हा सामना चेन्नईला चेन्नईच्या हातून सुटला. शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय झालं? त्याओव्हरमधील सर्व थरार खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये पाहा.
24 बॉलमध्ये 59 , 12 बॉलमध्ये 40 शेवटच्या 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज होती. संदीप शर्मा ओव्हर टाकत होता, या युवा गोलंदाजाला आयपीएलचा तसा चांगला अनुभव होतो. मात्र पहिले दोन चेंडू वाईड त्यानंतर दोन सिक्सर आणि तीन सिंगल त्यानंतर रॉयल्सचा अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. माही आज परत एकदा जुन्या फॉर्ममध्ये दिसला. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला.
पाहा व्हिडीओ-
#MSDhoni? #IPL23 #CSKvsRR #itsokmaaahi #thenailbitingmatch #mahi #dhoni200 #captaincool pic.twitter.com/IVRmDEeoRx
— Nagendra Indroka (@yours_nsindroka) April 12, 2023
The Man The Myth The Legend Mahendra Singh Dhoni Forever ? pic.twitter.com/CxPOn1WBGi
— ‘ (@ashMSDIAN7) April 12, 2023
Vintage dhoni’s sixes !#cskvsrr pic.twitter.com/d2KWjhUigB
— gαנαℓ (@Gajal_Dalmia) April 12, 2023
राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात एकदम खराब झाली, सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला तुषार देशपांडेने दुसऱ्या ओव्हरमध्ये माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या देवदत्तने आणि जोस बटलर यांनी चांगली भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी मोडली पडिक्कल याला 38 धावांवर माघारी पाठवलं. त्यापाठोपाठ कर्णधार संजू सॅमसनलाही त्याने शून्य धावांवर बाद केलं. संजू सॅमसन ही आउट झाल्यावर रविचंद्र आश्वरी मैदानात उतरला अश्विन आणि बटलर यांनी चांगली केळी केली यामध्ये आर अश्विनी याने दोन षटकार आणि एक चौकार मारत तीस धावांची एक शानदार खेळी करत गेली
संजू सॅमसन ही आउट झाल्यावर रविचंद्रन अश्विन मैदानात उतरला अश्विन आणि बटलर यांनी चांगली केळी केली. यामध्ये आर अश्विनने दोन षटकार आणि एक चौकार मारत 30 धावांची एक शानदार खेळी केली. आश्विन आऊट झाल्यावर आलेल्या शिमरॉन हेटमायर याने अवघ्या अठरा चेंडूंमध्ये 30 धावा ठोकल्या यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.