IPL 2023 | आयपीएलच्या 15 दिवसआधी टीममध्ये 2 मोठे बदल, या खेळाडूकडे कर्णधारपद

क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 16 व्या मोसमाची उत्सुकता लागून राहिली आहे. या मोसमाची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. त्याआधी एका टीमने आपला कॅप्टन बदलला आहे.

IPL 2023 |  आयपीएलच्या 15 दिवसआधी टीममध्ये 2 मोठे बदल, या खेळाडूकडे कर्णधारपद
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 4:51 PM

मुंबई | आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 16 व्या मोसमाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलमधील सर्वच्या सर्व 10 टीम या आपल्या घरच्या मैदानातही खेळणार आहेत. तसेच यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे. टीममध्ये 2 मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच 16 व्या पर्वाला मोजून 15 दिवस बाकी असताना टीमकडून कॅप्टनच बदलण्यात आलाय. टीम मॅनेजमेंटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या टीमचा कॅप्टन बदलला आहे. टीमचा नियमित कर्णधार ऋषभ पंत याचा अपघात झाल्यानंतर तो यातून हळूहळू सावरतोय. त्यामुळे ऋषभला या मोसमाला मुकावं लागंलय. त्यामुळे ऋषभच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या जबाबदारीसाठी वॉर्नरने टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत.

“मला ही जबाबदारी दिली, मला त्यासाठी पात्र समजलं, यासाठी मी टीम मॅनेजमेंटचा आभारी आहे. ऋषभ हा उत्कृष्ठ लीडर होता. त्याला आम्ही सर्व या मोसमात मिस करु”, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली.

दिल्लीत ‘दादा’गिरी

तसेच दिल्ली कॅपिट्ल्सने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार, बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याची दिल्ली कॅपिट्ल्स टीमच्या क्रिकेट डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गांगुलीने याआधी 2019 साली दिल्लीसाठी मेंटॉरपदाची भूमिका बजावली होती. गांगुलीने आपल्या निवडीसाठी टीम मॅनेजमेंटचे आभार मानले.

दरम्यान मोसमातील पहिला सामना हा गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबाद येथे 31 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्स आपली पहिली मॅच ही लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 1 एप्रिल रोजी होणार आहे.

टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.