Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | तिसऱ्या सामन्याआधी टीमला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा निर्णय

आयपीएलच्या 16 व्या मोसमात या टीमची सुरुवात पराभवाने झाली आहे. अजूनही टीम पहिल्या विजयाच्या शोधात आणि प्रतिक्षेत आहे. मात्र अशातच एका ऑलराउंडरने मोठा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 | तिसऱ्या सामन्याआधी टीमला मोठा झटका, 'या' स्टार खेळाडूचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:15 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला धडाक्यात सुरुवात झाली. या 16 व्या हंगामाला सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे. या आठवड्याभरात 9 सामन्यांचं यशस्वीपणे आयोज करण्यात आलं आहे. काही संघांना या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. त्यामुळे या संघांची पराभवाने सुरुवात झाली. तर दुसऱ्या बाजूला अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडले आहे. मात्र आपली टीम अडचणीत असताना, पहिले दोन्ही सामने गमावले असताना एका स्टार ऑलराउंडरने आपल्या टीमची साथ सोडली आहे. हा खेळाडू आयपीएल सोडून आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला आहे. त्यामुळे टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दिल्ली कॅपिट्ल्सला या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्ली तिसरा सामना शनिवारी 8 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी मोठी झटका लागला आहे. दिल्लीचा अनुभवी बॅटिंग ऑलराउंडर टीमची साथ सोडत मायदेशी परतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मिचेल मार्श मायदेशी परतल्याची माहिती मिळाली आहे. क्रिकबजनुसार, मिचेल मार्श लग्न करणार आहे, त्यासाठी तो माघारी परतला आहे. मार्श आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रेटा मार्क या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. रिपोर्टनुसार, मार्श जवळपास एक आठवडा ऑस्ट्रेलियात थांबणार आहे. त्यानंतर मार्श पुन्हा टीमसोबत जोडला जाणार आहे. मार्श याआधीच्या दोन्ही सामन्यात खेळला. मात्र त्याला छाप सोडता आली नव्हती.

दिल्लीची खराब सुरुवात

दरम्यान दिल्लीला या मोसमातील दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीचा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 50 धावांनी पराभव झाला. तर दुसऱ्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने दिल्लीवर घरच्या मैदानातच 6 विकेट्सने मात केली. आता दिल्ली आपला तिसरा सामना हा शनिवारी 8 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे.

टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.