Delhi Capitals | दिल्ली कॅपिट्ल्सला विजयानंतर आनंदाची बातमी, टीममध्ये माजी वर्ल्ड कप कॅप्टनची एन्ट्री

दिल्ली कॅपिट्ल्स टीमसाठी आयपीएल 16 व्या हंगातमील पहिल्या विजयानंतर आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी वर्ल्ड कप कर्णधारची दिल्लीच्या गोटात एन्ट्री झाली आहे.

Delhi Capitals | दिल्ली कॅपिट्ल्सला विजयानंतर आनंदाची बातमी, टीममध्ये माजी वर्ल्ड कप कॅप्टनची एन्ट्री
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली | दिल्ली कॅपिट्ल्स टीमची आयपीएल 16 व्या सिजनमधील सुरुवात अत्यंत वाईट आणि निराशाजनक राहिली. दिल्ली कॅपिट्ल्सला अनुक्रमे लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. सलग झालेल्या 5 सामन्यांमधील पराभवामुळे दिल्ली कॅपिट्ल्स टीम मॅनेजमेंटमध्ये चिंतेच वातावरण होतं. दिल्लीने अखेर शुक्रवारी 21 एप्रिल रोजी विजयाचं खातं उघडलं. दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 20 एप्रिल रोजी पावसामुळे सामना उशिराने सुरु झाला. हा सामना संपला तेव्हा 21 एप्रिल तारीख उजाडली होती. केकेआरने विजयासाठी दिलेल्या 128 धावांचं आव्हान दिल्लीने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आणि पहिलावहिला विजय मिळवला. यानंतर दिल्लीसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

स्टार खेळाडूची एन्ट्री

दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. या माजी कर्णधार राहिलेल्या खेळाडूच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कप उपविजेता राहिली आहे. टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या प्रियम गर्ग याची एन्ट्री झाली आहे. कमलेश नागरकोटी हा आयपीएलच्या या मोसमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे नागरकोटी याच्या जागी गर्ग याला संधी मिळाली आहे.

नागरकोटीच्या जागी खेळाडू घेण्यासाठी गर्ग आणि अभिमन्यू इश्वरन या दोघांना टेस्टसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र गर्गने यात बाजी मारली आणि जागा निश्चित केली. प्रियम गर्ग याआधी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळला आहे.

स्पोर्ट्सकीडाच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिट्ल्सने शुक्रवारी प्रियमला आपल्या जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सू्त्रांनी दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

सनरायजर्स हैदराबादने गर्ग याला अंडर 19 वर्ल्ड कपमधील कामगिरीच्या आधारावर 1 कोटी 90 लाख रुपये मोजून आपल्यात घेतलं. गर्गने आतापर्यंत 17 डावांमध्ये 15.69 च्या सरासरीने आणि 115.14 च्या स्ट्राईक रेटने 251 धावा केल्या आहेत.गर्ग पहिले 2 वर्ष हैदराबादमध्ये होत होता. मात्र त्यानंतर फ्रँचायजीने 2022 मध्ये गर्गला रिलीज केलं होतं. त्यानंतर गर्गला 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. यानंतर गर्ग 2023 मध्ये अनसोल्ड राहिला.

दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्स एकमेव विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. दिल्ली कॅपिट्ल्सची 6 सामन्यात एकमेव विजय तर 5 पराभव अशी सद्यस्थिती आहे. दिल्ली आपला आगामी सामना हा 24 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.