Team India | टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडरला बढती मिळाली आहे. या खेळाडूला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Team India | टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 4:12 PM

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. बॉर्डर गावसकर  ट्रॉफीतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. नागपूरमध्ये 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात कांगारुंचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. बीसीसीआयने यानंतर 2 कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर केला. यामध्ये कोणतेच बदल केले नाहीत. मात्र केएल राहुल याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतलं.

तर दुसऱ्या बाजूला आता आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्व संघ तयारीला लागले आहेत. ऋषभ पंत याला अपघातामुळे आयपीएलच्या 16 व्या मोसमाला मुकावं लागलं आहे. त्यामुळे पंतकडे असलेली दिल्ली कॅपिटल्सची सूत्र ही ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर डेव्हिड वॉर्नरकडे देण्यात आली आहेत. तर ऑलराउंडर अक्षर पटेल यालाही बढती मिळाली आहे.

अक्षर पटेल याला उपकर्णधार करण्यात आलं आहे.अक्षर याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अक्षर याने पहिल्या कसोटीत फक्त 1 विकेट घेतली.तर 174 बॉलमध्ये 10 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 84 रन्स केल्या. तर दुसऱ्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. पण त्याने ती उणीव बँटिगने भरून काढली. अक्षरने पहिल्या डावात 115 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 74 धावांची खेळी केली.

रँकिंगमध्ये मोठा फायदा

अक्षरला या कामगिरीचा आयसीसी ऑलराउंडर्स रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला. अक्षरने 2 स्थानांची झेप घेतली आहे. अक्षर यासह 5 व्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. अक्षरच्या नावावर 283 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

दरम्यान आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात ही 31 मार्चपासून होणार आहे. दिल्ली या मोसमातील आपली सुरुवात लखनऊ विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 1 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स टीम | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , अक्षर पटेल (उपकर्णधार) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, और विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.