IPL 2023 | दिल्ली कॅपिट्ल्समध्ये ‘हा’ स्टार खेळाडू घेणार ऋषभ पंत याची जागा!

कार अपघातामुळे टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आयपीएलच्या 16 व्या हंगामात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी दिल्ली कॅपिट्ल्स टीममध्ये मोठ्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL 2023 | दिल्ली कॅपिट्ल्समध्ये 'हा' स्टार खेळाडू घेणार ऋषभ पंत याची जागा!
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 12:09 AM

मुंबई | टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला. या काप अपघातातून ऋषभ पंत थोडक्यात बचावला. पंतवर आवश्यक उपचार झाले. शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तो हळुहळु फीट होताय. या अपघातामुळे पंत याला कमबॅकसाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे पंत आयपीएलच्या 16 व्या मोसमात खेळणार नाही. त्यामुळे दिल्ली टीमसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र आता दिल्ली टीममध्ये पंतची जागा घेण्यासाठी एका युवा खेळाडूने तयारी सुरु केली आहे.

पंतच्या गैरहजेरीत डेव्हिड वॉर्नर याला कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र विकेटकीपिंग कोण करणार, हा प्रश्न आहेच. त्यामुळे या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका करणाऱ्या सरफराज खान याला विकेटकीपिंगची संधी मिळू शकते. दिल्ली टीममध्ये फिल सॉल्ट याचा विकेटकीपर म्हणूनच समावेश करण्यात आला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सरफराज विकेटकीपिंगचा सराव करत असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली आयपीएलच्या 16 व्या मोसमातील आपला पहिला सामना हा 1 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे.

सरफराजची आयपीएल कारकीर्द

सरफराजने आयपीएलमध्ये 46 सामने खेळले आहेत. सरफराने 24.18 च्या सरासरीने आणि 137.82 च्या स्ट्राईक रेटने 532 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 13 षटकार आणि 59 चौकार ठोकले आहेत. तसेच एक अर्धशतकाचा समावेश आहे. सरफराजला गेल्या मोसमात फक्त 6 सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

डेव्हिड वॉर्नर याच्याकडे कॅप्टन्सी

दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या टीमचा कॅप्टन बदलला आहे. टीमचा नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अपघातामुळे आता ती जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याला देण्यात आली आहे. या जबाबदारीसाठी वॉर्नरने टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत.

“मला ही जबाबदारी दिली, मला त्यासाठी पात्र समजलं, यासाठी मी टीम मॅनेजमेंटचा आभारी आहे. ऋषभ हा उत्कृष्ठ लीडर होता. त्याला आम्ही सर्व या मोसमात मिस करु”, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली.

टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.