DC vs KKR | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द?
क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पावसामुळे अजूनही दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अजूनही पावसामुळे टॉस झालेला नाही.
नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 28 वा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र आता 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत टॉसही झालेला नाही. प्रत्यक्ष सामन्याला 10 तर टॉसला 40 मिनिट विलबं झाला आहे. याचं कारण आहे ते म्हणजे पाऊस. उभयसंघातील सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र तिथे जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे अद्याप टॉस झालेला नाही. यामुळे क्रिकेट चाहत्यांना सामना रद्द होण्याची भीती सतावतेय.
खेळपट्टीची पाहणी थोड्याच मिनिटात
पावसामुळे खेळपट्टीचं पुढील निरीक्षण हे 8 वाजून 15 मिनिटांनी करण्यात येणार आहे. आतापर्यंत सात, सव्वा सात, साडे सात आणि पावणे आठ अशा एकूण 4 वेळा खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आहे. आता सामना झाला पूर्ण 20 ओव्हरचा होणार नसल्याचंही म्हटंलं जात आहे.
दिल्लीचा पराभवाचा पंच
दिल्ली कॅपिट्ल्सला या मोसमात अजूनही एकही सामना जिंकता आलेला नाही. दिल्लीने या सिजनमध्ये आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यात दिल्लीला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. दिल्ली आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र केकेआर विरुद्धच्या सामन्याआधीच पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे दिल्लीचं टेन्शन आणखी वाढलंय.
पावसामुळे सामन्याला विलंब
UPDATE – Inspection rescheduled to 7:15 PM IST#TATAIPL | #DCvKKR https://t.co/8S4gTCSxHy
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये शून्य विजयासह पॉइंट्सटेबलच्या तळाशी अर्थात 10 व्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
दिल्ली कॅपिटल्स टीम | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, यश धुळ, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, एनरिक नोर्टजे, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार, सरफराज खान , चेतन साकारिया, प्रवीण दुबे, रिली रोसो, रोवमन पॉवेल, खलील अहमद, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, फिलिप सॉल्ट, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल आणि विकी ओस्तवाल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, मनदीप सिंग, अनुकुल रॉयल , वैभव अरोरा, डेव्हिड विस, टिम साउथी, जेसन रॉय, लिटन दास, कुलवंत खेजरोलिया, हर्षित राणा आणि आर्या देसाई.