Andre Russell | आंद्रे रसेल याचा तडाखा, शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्सचा पाऊस, व्हीडिओ व्हायरल

आंद्रे रसेल याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये एक नाय, दोन नाय, तर तीन खडेखडे सिक्स ठोकले. आंद्रेच्या या फटकेबाजीमुळे मैदानात एकच वातावरण तयार झालं होतं.

Andre Russell | आंद्रे रसेल याचा तडाखा, शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्सचा पाऊस, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 11:01 PM

नवी दिल्ली | आंद्रे रसेल, गोलंदाजांचा कर्दनकाळ. सामना कोणत्याही परिस्थितीत कधीही एकहाती पालटण्याची क्षमता ठेवणारा आक्रमक ऑलराउंडर आणि डेंजर बॅट्समन. आंद्रे रसेल याने आयपीएल 16 व्या मोसमातील 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स टीमकडून दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शानदार आणि निर्णायक खेळी केली. आंद्रे रसेल याने 31 बॉलमध्ये 1 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 38 धावा केल्या. आंद्रे रसेल याने केलेल्या या खेळीमुळे केकेआरकडून दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी सन्मानजनक आव्हान देता आलं.

केकेआरच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे दिल्लीची नाजूक स्थिती झाली होती. दिल्लीने उमेश यादव याच्या रुपात नववी विकेट गमावली होती. उमेश 15.4 ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर आंद्रे रसेल याने वरुण चक्रवर्ती याच्यासोबत डाव सावरला. या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 31 धावांची निर्णायक आणि महत्वाची भागीदारी केली.

दिल्लीच्या गोलंदाजांकडून डेथ ओव्हरमध्ये अफलातून बॉलिंग टाकण्यात आली. एनरिच नॉर्तजे आणि मुकेश कुमार या दोघांनी कडक बॉलिंग करत आंद्रे रसेल याला बांधून ठेवला होता. मुकेश कुमार याने आंद्रेला यॉर्कर टाकून जेरीस आणलं होतं. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये घात झाला. आंद्रे रसेल याने आपला इंगा दाखवलाच. आंद्रेने आपली दहशत दाखवली. आंद्रेने शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेश कुमारच्या बॉलिंगवर सलग 3 कडक सिक्स ठोकले. यापैकी एक सिक्स हा तब्बल 109 मीटर लांब मारला.

आंद्रे रसेल याचा 109 मीटर लांब सिक्स

केकेआरने शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण 19 धावा केल्या. त्यामुळे आता या धावा केकेआरच्या विजयात निर्णायक ठरणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आंद्रे रसेल याची सिक्सची हॅटट्रिक

केकेआरची बॅटिंग

केकेआरला दिल्ली कॅपिट्ल्सच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 127 धावाच करता आल्या. केकेआरकडून ओपनर जेसन रॉय याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 38 धावांचं योगदान दिलं. मनदीप सिंह याने 12 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वरुण चक्रवर्ती याने नाबाद 1* रन केली. दिल्ली कॅपिट्ल्सकडून इशांत शर्मा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्तजे या चौघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.

केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, लिटॉन दास, जेसन रॉय, सुनील नरेन, रिंकू सिंह, मंदीप सिंह, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव आणि कुलवंत खेजरोलिया.

दिल्ली कॅपिट्ल्स इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, मनीष पांडे, फिल सॉल्ट, ललित यादव, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.