DC vs MI IPL 2023 | मुंबई इंडियन्स टीमला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्याआधी मोठा झटका

आयपीएलच्या 16 व्या मोसमात सलग 2 सामने गमाल्याने मुंबई इंडियन्स आधीच अडचणीत आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

DC vs MI IPL 2023 | मुंबई इंडियन्स टीमला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्याआधी मोठा झटका
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 7:57 PM

नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 16 वा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने दिल्ली कॅपिट्ल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलंय. मात्र या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्सचा स्टार बॉलर हा सलग दुसऱ्या सामन्याला दुखापतीमुळे मुकला आहे. दुखापतीमुळे या स्टार बॉलरला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नाही. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस दरम्यान याबाबतची माहिती दिली. जसप्रीत बुमराह हा उपलब्ध नसल्याने बॉलिंग ग्रुपची पूर्ण जबाबदारी ही या गोलंदाजाच्या खांद्यावर होती. मात्र हा गोलंदाज चेन्नई सुपर किंग्सनंतर आता दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर झाला आहे.

जोफ्रा आर्चर हा आजच्या सामन्यातही खेळणार नाही. जोफ्रा अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या मुंबईची डोकेदुखी आणखी वाढली आहे. जोफ्रा आरसीबी विरुद्धच्या सामन्यात खेळला होता. त्यानंतर जोफ्राला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात खेळता आलं नव्हतं. तसेच आता दिल्ली विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्राच्या दुखापतीमुळे तो खेळू शकत नाही.

हे सुद्धा वाचा

मुंबई-दिल्लीत प्रतिष्ठेचा सामना

दरम्यान मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांना आतापर्यंत या मोसमातील आपलं विजयी खातं उघडता आलेलं नाही. दिल्लीने या मोसमातील तिन्ही सामने गमावले आहेत. तर पलटणचाही पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झालाय. यामुळे आता हा सामना जिंकून विजयी खातं उघडण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा आहे. मात्र या दोघांपैकी कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, जेसन बेहरनडॉर्फ, अरशद खान, पियूष चावला आणि रायली मेरेडीथ.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, यश धूळ, रोवमॅन पावेल, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.