DC vs MI : मुंबई इंडिअन्स संघाने असा मिळवला शेवटच्या बॉलवर विजय, पाहा Video
एक वेळ सामना टाय होत सुपर ओव्हर होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र हाच तो चेंडू ज्यावर दोन धावा काढत मुंबईने पहिला विजय साकार साकरला.
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पलटणने अखेर बाजी मारली आहे. या विजयासह मुंबई संघाने यंदाच्या पर्वातील पहिला विजय मिळवला आहे.आरसीबी सारखा हाही सामना तितकाच एकदम चुरशीचा झालेला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हर मध्ये मुंबईला सहा चेंडू फक्त पाच धावांची गरज होती. तरीही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. नॉर्खियाने एकदम घातक गोलंदाजी करत मुंबईलाअडकून ठेवलं होतं, एक वेळ सामना टाय होत सुपर ओव्हर होईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र हाच तो चेंडू ज्यावर दोन धावा काढत मुंबईने पहिला विजय साकार साकारला.
पाहा व्हिडीओ-
Mumbai Indians Register their first victory of #IPL2023 finally duniya hila di ?#DelhiCapitals #dc #mi #SuryakumarYadav #RohitSharma? #axarpatel #DCvMI #DavidWarner#MIvsDC pic.twitter.com/ppbxwZwPhf
— Prateek Bhutani (@bhutanipratik15) April 11, 2023
मुंबईचा डाव
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि इशान किशन जोडी मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माच्या चुकीच्या कॉलमुळे इशान किशन धावचीत झाला. त्याने 26 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतरही रोहित शर्माने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. सामना रंगतदार वळणावर आला असताना तिलक वर्माने आक्रमक खेळी केली. त्याने 29 चेंडूत 41 धावा केल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव वाढला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 45 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून टिम डेविडला संधी दिली. टीम डेविड आणि कॅमरून ग्रीनने गेलेला सामना पुन्हा आणला असं म्हणायला हरकत नाही.
टिम डेविड आणि कॅमरून ग्रीननं मोक्याची क्षणी षटकार आणि चौकार मारल्याने सामना विजयी करण्यात यश आलं. टिम डेविडने 11 चेंडूत 13 धावा केल्या. तर कॅमरून ग्रीनने 8 चेंडूत 17 धावा केल्या.
दिल्लीचा डाव
दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळीने सुरुवात केली. ही जोडी फोडण्यात ऋतिक शोकीनला यश आलं. पृथ्वी शॉ त्याच्या गोलंदाजीवर 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे जोडी मैदानात चांगली जमली. ऋतिकने आठव्या षटकातील एक चेंडू नो टाकला त्यावर फ्री हीट मिळाला. त्यावर स्ट्राईकला डावखुरा डेविड वॉर्नर होता. मात्र त्याने डावखुरा पद्धतीने फलंदाजी करण्याऐवजी उजव्या हाताने गोलंदाजीला सामोरा गेला. यामुळे मैदानात उपस्थित खेळाडूंसह समालोचकांना सुद्धा प्रश्न पडला नेमकं डेविड वॉर्नरला झालं तरी काय? पण फ्री हीट असलेला चेंडू वाया गेला. म्हणजेच त्या चेंडूवर षटकार किंवा चौकाराऐवजी एक धावेवर समाधान मानावं लागलं.
पियुष चावला याच्या गोलंदाजीवर मनिष पांडे बाद झाला. त्याने 18 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर यश धुल आला आणि हजेरी लावून गेला. रिले मेरेडिथच्या गोलंदाचीवर नेहन वधेराने त्याचा झेल घेतला. रोवमॅन पॉवेल काही खास करू शकला नाही. 4 धावांवर पियुष चावलानं त्याला पायचीत केलं. त्यानंतर आलेला ललित यादवही काही खास करू शकला नाही. 2 या धावसंख्येवर त्रिफळाचीत झाला.
डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल जोडीने चांगली फटकेबाजी केली. एका बाजूला 43 चेंडूत डेविड वॉर्नरने आपलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर अक्षर पटेलनं जलद अर्धशतक झळकावलं. त्याने 25 चेंडूत 54 धावा केल्या. अक्षर बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नर 47 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवला यादवला भोपळाही फोडता आला नाही. धावचीत होत तंबूत परतला. त्यानंतर अभिषेक पेरोल 1 धाव करून झेल बाद झाला. एनरिच नॉर्तजे 5 धावांवर त्रिफळाचीत झाला. एकाच षटकात 4 गडी बाद झाले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारत्या आल्या नाहीत.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ