DC vs PBKS Dream 11 Prediction | हे 11 खेळाडू करतील तुम्हाला मालामाल, ड्रीम इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूंना घ्या!

| Updated on: May 13, 2023 | 2:23 AM

Delhi Capitals vs Punjab Kings Preview | शनिवारी 13 मे रोजी आयपीएल 16 व्या पर्वातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे.जाणून घ्या ड्रीम प्लेइंग इलेव्हन.

DC vs PBKS Dream 11 Prediction | हे 11 खेळाडू करतील तुम्हाला मालामाल, ड्रीम इलेव्हनमध्ये या खेळाडूंना घ्या!
Follow us on

नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 13 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. या दोन्ही संघांतील सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. ड्रीम इलेव्हनमुळे क्रिकेट चाहत्यांना कोट्याधीश होण्याची संधी आहे. प्रत्येक जण ड्रीम इलेव्हनसाठी प्रयत्न करत असतो. मात्र दररोज थोडक्यासाठी अंदाज चुकतो आणि कोट्यधीश होण्याचं स्वप्न भंगत. दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात ड्रीम इलेव्हनमध्ये कोण असायलं हवं, ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

दिल्ली विरुद्ध पंजाब या सामन्यात तुम्ही फिलिप सॉल्ट याला विकेटकीपर करु शकता. बॅट्समन म्हणून डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन या दोन्ही कर्णधारांची निवड करु शकता. सोबत जितेश शर्मा याला संधी देऊ शकता. यात शिखर धवन याला कर्णधार म्हणून खेळवू शकता.

ऑलराउंडर म्हणून मिचेल मार्श याला उपकर्णधार ठेवू शकता. तसेच लियाम लिविंगस्टोन आणि अक्षर पटेल या तिकडीला घेतल्यास फायदा होऊ शकतो. तसेच बॉलर म्हणून अर्शदीप सिंह याला घेऊ शकता. अर्शदीप पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. तो सातत्याने विकेट्स घेतोय. अर्शदीपला घेणं फायदेशीर होऊ शकतं. त्याशिवाय कुलदीप यादव आणि राहुल चाहरला संधी देऊ शकता.

दिल्ली विरुद्ध पंजाब ड्रीम इलेव्हन

बॅट्समन | शिखर धवन(कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर आणि जितेश शर्मा.

बॉलर | अर्शदीप सिंह, राहुल चाहर आणि कुलदीप यादव.

विकेटकीपर | फिलिप सॉल्ट

ऑलराउंडर | मिचेल मार्श (उपकर्णधार), अक्षर पटेल आणि लियाम लिविंगस्टोन.

पिच रिपोर्ट

अरुण जेटली स्टेडियम बॅटिंगसाठी पूरक अशी आहे, सोप्या भाषेत बॅट्समन अधिक धावा करु शकतात. मात्र सोबतच फिरकी गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी मदतशीर ठरते. इथे टॉस जिंकल्यानंतर अनेक संघांचा फिल्डिंग करण्याकडे ओढा असतो.

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स | डेव्हिड वार्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिले रोसौव, अक्षर पटेल, अमन हाकिम खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.

पंजाब किंग्स | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम क्यूरन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह.