DC vs PBKS | पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा भेदक मारा, 31 धावांनी शानदार विजय, दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान संपुष्टात
पंजाब किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्सला घरच्या मैदानात पराभूत केलं आहे. पंजाब किंग्सने दिल्लीला पराभूत करत प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर दिल्ली या 16 व्या मोसमातून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे.
नवी दिल्ली | पंजाब किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स संघावर 31 धावांनी शानदार आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. प्रभासिमरन सिंह याने केलेल्या शतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 168 धावांचं दिलं होतं. मात्र पंजाबच्या भेदक माऱ्यासमोर कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याचा अपवाद वगळता एकालाही मैदानात धड टिकता आलं नाही. पंजाबने या विजयासह आयपीएल प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. तर दिल्लीचा आता बाजार उठला आहे. दिल्लीच्या या पराभवामुळे उरल्यासुरल्या आशाही संपल्या आहेत.
प्रभासिमरन सिंह आणि हरप्रीत ब्रार हे दोघे पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले. प्रभासिमरन याने आधी शतक ठोकलं. तर त्यानंतर हरप्रीत याने दिल्लीच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 8 व्या क्रमांकावरुन 12 पॉइंट्ससह 6 व्या स्थानी झेप घेतली आहे.
पंजाब किंग्स विजयी
A remarkable bowling performance from @PunjabKingsIPL ????
They clinch a crucial 31-run victory in Delhi ✅
Scorecard ▶️ https://t.co/bCb6q4bzdn #TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/OOpKS8tFV5
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2023
पंजाबची बॅटिंग
दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्स टीम कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने प्रभासिमरन सिंह याच्या शतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. पंजाबकडून प्रभासिमरन सिंह याने सर्वाधिक धावा केल्या. प्रभाने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 103 धावा केल्या. प्रभाला मुकेश कुमार याने बोल्ड केला.
प्रभाव्यतिरिक्त सॅम करन याने 20 तर सिंकदर रजा याने नाबाद 11 धावा केल्या. या दोघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्लीकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि मुकेश कुमार या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.