Virat Kohli | गौतम गंभीर याच्याशी राडा करणारा विराट कोहली चक्क पाया पडला, व्हीडिओ व्हायरल
विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. विराटचा आक्रमकपणा याआधी अनेकदा पाहिला आहे. मात्र विराटचं दुसरं रुप समोर आलं आहे. विराटचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली | विराट कोहली, टीम इंडियाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा आक्रमक आणि तापट स्वभावाचा फलंदाज. विराट कोहली याचा तापट स्वभावाचा नमुना आतापर्यंत प्रत्येक क्रिकेट चाहत्यांने पाहिला आहे. आयपीएल 16 व्या सिजनमध्ये 1 मे रोजी विराट कोहली आधी नवीन उल हक आणि त्यानंतर गौतम गंभीर याच्यासोबत भिडला. विराट कोहली आणि आणि गौतम गंभीर यांच्यात मारामारी होते की काय, अशी भीती चाहत्यांना वाटत होती. मात्र सुदैवाने ती वेळ आली नाही.
या अशा आक्रमक आणि रागीट आणि तापट स्वभावाच्या विराट कोहली याचं दुसरं रुप क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. विराट कोहली याची ही दुसरं रुप पाहून चाहत्यांना ही धक्काच बसलाय. गौतम गंभीर याच्यासोबत राडा घालणारा विराट कोहली चक्क पाया पडलाय. विराट कोहली याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
विराटने दिल्ली विरुद्ध आरसीबी या सामन्याआधी विराट कोहली सरावासाठी मैदानात उतरला. यावेळेस विराट कोहलीचे लहाणपणीचे कोच राजकुमार शर्मा हे मैदानात हजर होते. राजकुमार शर्मा यांना पाहताच विराट त्यांच्या दिशेने चालत गेला आणि सर्वात आधी त्यांच्या पाया पडला. विराटने पाया पडल्यानंतर राजकुमार शर्मा यांना घट्ट मीठी मारली. यानंतर दोघांनी चर्चा केली. विराटचं हे रुप पाहून चाहतेही शॉक झाले.
विराट कोहली आणि राजकुमार शर्मा
A wholesome meet & greet ?@imVkohli catches up with his childhood coach ????#TATAIPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/YHifXeN6PE
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
दरम्यान विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 55 धावांची खेळी केली. 46 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीने 55 रन्स ठोकल्या. विराटच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. विराट यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटच्या नावावर 50 अर्धशतकांची नोंद आहे. तर या यादीत डेव्हिड वॉर्नर हा 59 अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.