IPL 2023 : मुंबई विरुद्ध पराभव, स्वत:ही अपयशी! आता विराट कोहलीने ट्वीट करत सांगितलं कोणाशी असेल स्पर्धा

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत विराट कोहली खेळत असलेल्या संघाला एकदाही जेतेपद जिंकता आलं नाही. त्यात विराट कोहली आणि खेळाडूंचा वाद असं चित्र आहे. त्यात आता विराट कोहलीचं ट्वीट चर्चेत आलं आहे.

IPL 2023 : मुंबई विरुद्ध पराभव, स्वत:ही अपयशी! आता विराट कोहलीने ट्वीट करत सांगितलं कोणाशी असेल स्पर्धा
IPL 2023 : आरसीबीची प्लेऑफसाठी धडपड, मोक्याच्या क्षणी अपयशी ठरलेल्या विराट कोहलीचं नवं ट्वीट चर्चेत
| Updated on: May 10, 2023 | 6:43 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा ही विराट कोहली रंगली आहे. कधी चांगल्या प्रदर्शनामुळे, तर कधी वादामुळे विराट कोहली चर्चेत आला आहे. मैदानात असो की मैदानाबाहेर विराट कोहली काही गप्प बसण्याचं नाव घेत नाही. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज नवीन उल हकसोबत भांडण झाल्यानंतर जोरदार चर्चा रंगली आहे. आता तर मैदानाबाहेर सोशल मीडियावर हा वाद येऊन पोहोचला आहे. आता विराट कोहलीचं नवं ट्वीट चर्चेत आलं आहे.

प्लेऑफसाठी महत्त्वाचा असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात विराट कोहली अवघी एक धाव करून तंबूत परतला. त्याचबरोबर विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबतही चर्चा रंगली आहे. अर्धशतकं करतो खरा पण किती चेंडूत असा प्रश्नही चाहते विचारत आहेत. त्याच्या या खेळीबाबत सोशल मीडियावर नेटिझन्स प्रश्न उपस्थित करत आहेत.

मैदानात खेळाडूंसोबत भांडतो खरा, पण चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे, असं सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत. या दरम्यान विराट कोहलीने एक ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘स्पर्धा फक्त त्याच्या डोक्यात आहे. पण खरा सामना माझा माझ्याशीच आहे.’ असं ट्वीट करत एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोवर ट्विटर युजर्सने वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. ही पोस्ट नवीन उल हकच्या इंस्टाग्राम पोस्टशी जोडली जात आहे. त्याने मुंबई विरुद्ध बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ही पोस्ट केली होती.

कोहली विरुद्ध नवीन सोशल मीडिया कोल्ड वॉर

लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 1 मे रोजी झालेल्या सामन्यात भांडणं झाली होती. विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यानंतर सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरु झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर गौतम गंभीरने एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टवरून विराटला लक्ष्य केल्याचं बोललं जात होतं.

कोहलीने यानंतर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स स्पर्धेतील फोटो पोस्ट केले होता. लखनऊच्या पराभवानंतर नवीन उल हकला उत्तर दिल्याचं बोललं जात होतं. यानंतर विराट कोहली मुंबई विरुद्धच्या सामन्यात 1 धाव करत बाद झाला. त्यावेळी नवीनने दोन फोटो पोस्ट केले होते. यावरून सोशल मीडियावर जोरदार कोल्ड वॉर रंगल्याचं दिसत आहे.