PBKS vs DC IPL 2023 : पंजाबचं नशिबच फुटकं, दिल्लीने पराभूत केलं आणि थेट स्पर्धेबाहेर

आयपीएल 2023 स्पर्धेतील रंगतदार सामन्यात दिल्लीने पंजाबवर 15 धावांनी विजय मिळवला. या पराभवामुळे पंजाबच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

PBKS vs DC IPL 2023 : पंजाबचं नशिबच फुटकं, दिल्लीने पराभूत केलं आणि थेट स्पर्धेबाहेर
PBKS vs DC IPL 2023 : हम तो डूबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे! दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न धुळीला मिळवलं
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:41 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला 15 धावांनी पराभूत केलं. पंजाब किंग्सला हा विजय आवश्यक होता. मात्र दिल्लीने पंजाबचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं खरं पण रिली रोस्सोच्या आक्रमक खेळीमुळे पंजाबला मोठं आव्हान मिळालं. रोस्सोने 37 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. दिल्लीने पंजाबसमोर 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावांचं आव्हान दिलं. मात्र पंजाबचा संघ 8 गडी गमवून 198 धावा करू शकला.

पंजाबचा डाव

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या विजयासाठी दिलेल्या 214 आव्हान गाठण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन ही जोडी मैदानात उतरली. शिखर धवनच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसऱ्या गड्यासाठी प्रभसिमरन आणि अथर्व तायडे या जोडीने अर्धशतकी खेळी केली. पण दुखापतीमुळे अथर्व तायडे रिडायर्ड हर्ट झाला. त्याने 42 चेंडूत 55 धावा केल्या. त्यानंतर लायम लिविंगस्टोनने मोर्चा सांभाळला. आक्रमक खेळी करत लिविंगस्टोनने सामाना शेवटच्या षटकापर्यंत आणला. एका क्षणी असं वाटत होतं की हा सामना पंजाब जिंकेल पण हा सामना पंजाबने 15 धावांनी गमावला.

लिविंगस्टोनने मोर्चा सांभाळला असताना जितेश शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शाहरुख खान 6 धावा करून तंबूत परतला. सॅम करनकडून खूप आशा असताना 11 धावांवर बाद झाला. हरमनप्रीत ब्रारने लिविंगस्टोनला स्ट्राईक देण्यासाठी धावचीत झाला. त्यानंतर लिविंगस्टोनने शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. मात्र काही एक उपयोग झाला नाही. 94 धावा करून समाधान मानावं लागलं.

दिल्लीचा डाव

पंजाबने नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली. डेविड वॉर्नरने 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने दमदार कमबॅक केलं आहे. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. त्यानंतर पृथ्वी शॉ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जोरदार फटका मारला. पण सीमारेषेवर अथर्व तायडेने त्याचा झेल घेतला. पृथ्वी शॉने 38 चेंडूत 54 धावा केल्या.

पृथ्वी शॉनंर रिली रोस्सोने मोर्चा सांभाळला. रिली रोस्सोने 37 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याला फिल सॉल्टने चांगली साथ दिली. 14 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.