IPL 2023 Orange and Purple Cap | आकाश मधवालच्या सुपर 5 विकेट्स, पर्पल-ऑरेन्ज कॅप कुणाकडे?
मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स टीमच्या 5 फलंदाजांचा काटा काढला. यानंतर आता ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये काही बदल झालाय का हे आपण माहित करुन घेऊयात.
तामिळनाडू | मुंबई इंडियन्स टीमने आयपीएल एलिमिनेटर 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स टीमवर 81 धावांनी विजय मिळवला. मुंबईने लखनऊला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी लखनऊला 101 धावांवर 16.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. मुंबईने या मोठ्या विजयासह मागील 3 पराभवांचा एका झटक्यात हिशोब क्लिअर केला. मुंबईने विजयासह क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. मुंबईचा आता प्लेऑफ 2 मध्ये गुजरात टायटन्स टीम विरुद्ध चेन्नई विरुद्ध भिडण्यासाठी सामना होईल.
आकाश मढवाल याने लखनऊ विरुद्ध 5 विकेट्स घेत मुंबईचा विजय सोपा केला. मढवाल मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. आता या विजयानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये काही बदल झालाय का, तसेच ही ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे. हे आपण जाणून घेऊयात.
ऑरेन्ज कॅप फाफकडेच
ऑरेन्ज कॅपही आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस याच्याकडेच आहे. पहिल्या 5 फलंदाजांपैकी फक्त 2 खेळाडूंमध्येच ही ऑरेन्ज कॅपची लढत रंगणार आहे. कारण फाफ आणि गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज शुबमन गिल या दोघांच्या धावांमध्ये फक्त 8 धावांचं अंतर आहे. शुबमनने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या क्वालिफायर 2 मध्ये 9 धावा केल्यास, ऑरेन्ज कॅप त्याची होईल.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल आहे. या दोघांच्या टीमचं आव्हान संपलंय. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कॉनवेला आपलं स्थान सुधारण्याची संधी अंतिम सामन्यात असणार आहे.
पर्पल कॅप कुणाकडे?
पर्पल कॅप गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमी याच्याकडेच आहे. मात्र पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या 5 गोलंदाजांच्या स्थानात अदलाबदल झाली आहे. पीयूष चावला याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 1 विकेट घेत थेट पाचव्या क्रमांकावरुन युजवेंद्र चहल याला मागे टाकत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहल याची चौथ्या आणि चेन्नई सुपर किंग्स टीमचा युवा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडे याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. विशेष बाब म्हणजे, पीयूष, युझवेंद्र आणि तुषार या तिघांच्या नावावर प्रत्येकी 21 विकेट्स आहेत. मात्र पीयूषचा इकॉनॉमी रेट चांगला असल्याने तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबई क्वालिफायर 2 मध्ये पोहचल्याने गुजरात टायटन्स विरुद्ध लढत होणार आहे. या लढतीत ऑरेन्ज कॅप होल्डर मोहम्मद शमी, दुसऱ्या क्रमांकावर असलेला राशिद खान आणि पीयूष चावला यांच्यात विकेट्स घेत पर्पल कॅपसाठी चढाओढ पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.