M S Dhoni Retirment | माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ : महेंद्रसिंह धोनी

CSK vs GT Final 2023 | महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स टीमने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने विजयानंतर निवृत्तीबाबत थेट प्रतिक्रिया दिली.

M S Dhoni Retirment | माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ : महेंद्रसिंह धोनी
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 5:03 AM

अहमदाबाद | रविंद्र जडेजा याने निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नई सुपर किंग्स चॅम्पियन ठरली. सीएसकेने आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं विजयी आव्हान मिळालं. चेन्नईने हे आव्हान शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केलं. रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जड्डूने चेन्नईला विजयााठी 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना सिक्स आणि फोर ठोकला. त्यामुळे चेन्नईने सनसनाटी विजय मिळवला. चेन्नईने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएल टॉर्फी जिंकण्याची कामगिरी केली. धोनीने या मोठ्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये हर्षा भोगले यांच्यासोबत संवाद साधला.

सामन्याचा धावता आढावा

गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी 215 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाल्याच्या 3 बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हर्समध्ये विजयासाठी 171 धावांच सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

चेन्नई पाचव्यांदा चॅम्पियन

दरम्यान चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ ठरलीय. चेन्नईने पहिल्यांदा 2010 साली मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशा एकूण 5 वेळा हा कारनामा केलाय. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मुंबईनेही 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

धोनीची निवृत्तीबाबत प्रतिक्रिया

“माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याहून कठीण गोष्ट म्हणजे 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल, शरीरासाठी ते सोपं होणार नाही” अशी धोनीने प्रतिक्रिया दिली.

महेंद्रसिंह धोनी रिटायर होण्याबाबत म्हणाला….

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.