अहमदाबाद | आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या महामुकाबल्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या अंतिम सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र त्याआधीच अहमदाबाद आणि नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आसापासच्या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसायला लागल्या. त्यामुळे 7 वाजता टॉसही होऊ शकला नाही.
पावसाच्या व्यत्ययामुळे जर सामना आज होऊ शकला नाही, तर चॅम्पियन कोण ठरणार, असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेत. तसेच या फायनल मॅचसाठी राखीव दिवस आहे की नाही, असाही गोंधळ क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. क्रीडा विश्वातील दिग्गजानांमध्येही राखीव दिवसाबाबत गोंधळ दिसून येतोय. कारण बीसीसीआयने आयपीएल प्लेऑफ वेळापत्रकात राखीव दिवसाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे महाअंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे की नाही, हे आपण जाणून घेऊयात.
एका बाजूला जोरदार पाऊस पडत होता, तर दुसऱ्या बाजूला क्रिकबझ क्रिकेट चाहत्यांना गोंधळात टकत होते. आपल्याकडून चूकीची माहिती दिल्याचं लक्षात येताच क्रिकबझने दिलगिरी व्यक्त केली. मात्र यामुळे क्रिकेट चाहते आणखी कन्फ्युज झाले. अशा परिस्थितीत आयपीएल किंवा बीसीसीआयकडून राखीव दिवसाबाबत माहिती देणं अपेक्षित होतं. मात्र तसं काही झालं नाही. अखेर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने राखीव दिवसाबाबत माहिती दिली.
या बदललेल्या नियनामुसार, रात्री 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत खेळ सुरु झाल्यास सामना पूर्ण 20 ओव्हरचा होईल. मात्र ते आता होणार नाही, कारण व 9 वाजून 35 होऊन गेलेत. त्यामुळे आता सामना सुरु झाला, तर वेळेनुसार ओव्हर कमी होत जातील. तसेच तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे 5 ओव्हरचा सामना. 12 वाजून 6 मिनिटापर्यंत 5 ओव्गहरचा सामना होऊ शकतो. मात्र पाऊस थांबलाच नाही, तर 29 मे या राखीव दिवशी अंतिम सामना खेळवण्यात येईल.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.