तामिळनाडू | चेन्नई सुपर किंग्स टीम आयपीएल 16 व्या मोसमातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना हा 14 रोजी खेळली. एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून 6 विकेट्सने पराभव झाला. चेन्नईला आपल्या घरच्या मैदानात विजयी शेवट करण्यात अपयश आलं. तसेच चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचा हा अखरचा सामना आणि अखेरचा आयपीएल मोसम असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे घरच्या मैदानातील शेवटचा सामना असल्याने चेन्नईच्या टीमने चाहत्यांचे आभार मानले. यावेळेस चेन्नई टीमने संपूर्ण मैदानात फेरा मारला. यावेळेस खेळाडूंनी चाहत्यांना टेनिस बॉल आणि टीमची जर्सी गिफ्ट म्हणून दिली. बॉल आणि जर्सी खेळाडू चाहत्यांच्या दिशेने फेकून देत होते. यामध्ये धोनी आघाडीवर होता.
धोनीचा अखेर सामना असल्याचं समजून प्रत्येक जण त्याला अखेरचा डोळे भरुन पाहत होता. धोनी पण कुठेतरी भावूक झालेला दिसून आला. या दरम्यान मैदानात टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे केविन पीटरसन याच्यासोबत मैदानात सामन्याबाबत विश्लेषण करत होते. धोनी आपल्या मागून येत असल्याची चाहूल गावसकरांना लागली. गावसकर धोनीच्या दिशेने धावून गेले.
दोन दिग्गज एका फ्रेममध्ये
Proof that @msdhoni is the legend of legends!
During @ChennaiIPL's lap of honour for their wonderful fans, #SunilGavaskar rushed to Dhoni and a truly #Yellovemoment was created by the two legends!
Tune-in to #IPLOnStar LIVE every day.#BetterTogether pic.twitter.com/hzDDdMkYjG
— Star Sports (@StarSportsIndia) May 15, 2023
एखादी व्यक्ती आपल्या आयडॉल, मेन्टॉरच्या दिशेने धावत जातो, त्यापेक्षा दुप्पट वेगाने गावसकर धावत गेले. मैदानात उपस्थित असलेल्या कुणाकडून तरी त्यांनी मार्कर घेतला आणि धोनीकडून थेट शर्टावर ऑटोग्राफ मागितला. धोनीने ऑटोग्राफ दिला. या दरम्यान धोनी आणि गावसकर या टीम इंडियाच्या दोन दिग्गजांनी एकमेकांना मीठी मारली. या दिग्गजांमधील या सुवर्ण क्षणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सर्व घटनेची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली. गावसकर या शर्टाचं काय करणार, असा प्रश्न लिटील मास्टर यांना विचारण्यात आला, यावर ते काय म्हणाले, हे आपण जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यातील दुसऱ्या डावात सुनील गावसकर, पद्मजीत सेहरावत आणि मिताली राज हे तिघे समालोचन करत होते. यावेळेस धोनीसोबतच्या रविवारी झालेल्या ऑटोग्राफ प्रकरणाबाबत चर्चा सुरु होती. या दरम्यान सेहरावत यांनी धोनीकडून ऑटोग्राफ घेतलेल्या शर्टाचं काय करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर गावसकर म्हणाले की “मी त्याचा फॅन आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या हिरोला जवळून पाहणं, स्पर्श करण्याचं स्वप्न असतं. तसंच मी केलं. धोनीचा ऑटोग्राफ घेतला. तो शर्ट मी माझ्याकडे कायम जपून ठेवणार”, असं गावसकर यांनी सांगितलं.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.