Gautam Gambhir : गौतम गंभीर याने मैदाना बाहेरूनही विराट कोहली सोबतचा घेतला बदला? नेमकं काय केलं?
मुंबई आणि आरसीबीमध्ये आता सामना सुरू असून त्यामध्ये कोहली अवघी 1 धाव काढून बाद झाला. याचाच धागा पकडत गौतमने पुन्हा एकदा विराट कोहली याला डिवचलं आहे.
मुंबई : गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामधील हाय व्होल्टेज ड्रामा सर्व क्रिकेट वर्तुळाने पाहिला. दोन्ही दिग्गज खेळाडू भर सामन्यात एकमेकांना भिडले होते. हा वाद मैदानामध्ये मिटला असं सर्वांना वाटलं होतं. मात्र अद्यापही याचे पडसाद दिसत आहेत. गौतम गंभीर याने मैदाना बाहेरूनही विराट कोहलीला टशन दिली आहे. मुंबई आणि आरसीबीमध्ये आता सामना सुरू असून त्यामध्ये कोहली अवघी 1 धाव काढून बाद झाला. याचाच धागा पकडत गौतमने पुन्हा एकदा विराट कोहली याला डिवचलं आहे.
विराट कोहली बाद झाल्यावर गौतमे आपल्या इन्स्टावर स्टोरी ठेवली आहे. यामध्ये विराट कोहलीला मुंबईचा जेसन बेहरेनडॉर्फ गोलंदाजी करत होता. सामन्यात बेहरेनडॉर्फने कोहलीला आऊट केलं आहे. कोहलीनेही लखनऊ आणि गुजरातच्या सामन्यावेळी इन्स्टा स्टोरी ठेवली होती. याचाच बदला म्हणून गंभीरने स्टोरीछ ठेवल्याची चर्चा नेटकरी करत आहेत.
गौतमच नाहीतर नवीन उल हक यानेही विराट आऊट झाल्यावर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू नवीन उल हक याने एक पोस्ट केली आहे. दोघांनीही स्टोरी ठेवत विराटला डिवचण्याचा प्रयत्न केलाय हे उघड आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड