M S Dhoni Retirement | रिटायर्ड होणार की नाही? धोनीने असंख्य चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिलंच

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा IPL 2023 हा अखेरचा मोसम असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर धोनीनेच असंख्य चाहत्यांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर देत डोकेदुखी संपवलीय.

M S Dhoni Retirement | रिटायर्ड होणार की नाही? धोनीने असंख्य चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिलंच
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 1:04 AM

तामिळनाडू | चेन्नई सुपर किंग्स टीमने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या प्लेऑफमधील क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स टीमचा 15 धावांनी धुव्वा उडवला. यासह धोनीसेनेने आयपीएल इतिहासात दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचण्याची कामगिरी केली आहे. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र चेन्नईने गुजरातला 20 ओव्हरमध्ये 157 धावांवर ऑलआऊट केलं. गुजरातचा पराभव झाला असला, तरी त्यांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी आहे.

दुसऱ्या बाजूला सामना संपल्यानंतर चेन्नई कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये चर्चा केली. या दरम्यान समालोचक हर्षा भोगले यांनी असंख्य क्रिकेट चाहत्यांचा मनातील प्रश्न धोनीला विचारला. हर्षा भोगले यांनी धोनीला थेट न विचारता फिरवून निवृत्तीबाबत प्रश्न केला. हर्षा भोगले यांच्या या प्रश्नाला धोनीने उत्तर दिलं. त्यामुळे असंख्य चाहत्यांनाही त्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर मिळालं.

धोनी काय म्हणाला?

तु इथे पुन्हा चेपॉकमध्ये येऊन खेळशील का, असा सवाल हर्षा भोगले यांनी धोनीला केला. यावर धोनीने जे उत्तर दिलंय, ते सोशल मीडियावर व्हायरल झालंय. “मला माहिती नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 8 ते 9 महिने आहेत. निवृत्तीबाबतची डोकेदुखी आताच कशाला घ्यायची मी नेहमीच सीएसकेसाठी चेपॉकमध्ये असेन. जिथे चेन्नई असेल तिथे मी असेन”, असं धोनीने भोगलेंच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

धोनीच्या उत्तरामुळे तो इतक्यात तरी निवृत्ती जाहीर करणार नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र धोनी कधी काय करेल, याचा नेम नाही. धोनीने याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणाला काही कळू न देता एकदाच निवृ्ती जाहीर केली होती. त्यामुळे धोनी चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूला टीम इंडियाच्या जर्सीत अखेरचं भरून पाहण्याची संधी मिळाली नाही. मात्र धोनी आयपीएलमध्ये तरी ती संधी देणार की आपल्या नेहमीच्याच शैलीत निवृत्तीचा निर्णय घेणार, हे येत्या वेळेतच स्पष्ट होईल.

हर्षा भोगले यांच्या प्रश्नावर धोनी काय म्हणाला?

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.