IPL 2023 GT vs DC : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीपुढे दिल्लीची शरणागती, 24 चेंडूत केलं असं की…

GT vs DC : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मोहम्मद शमीचा पेपर त्यांना चांगलाच कठीण गेला. पॉवरप्लेमध्ये असं काय केलं की भल्याभल्यांना घाम फुटला.

IPL 2023 GT vs DC : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीपुढे दिल्लीची शरणागती, 24 चेंडूत केलं असं की...
IPL 2023 GT vs DC : मोहम्मद शमीच्या चक्रव्यूहात दिल्लीचा संघ, 24 चेंडूत केली अशी जादूImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:50 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 44 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचं दिसलं. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे पॉवरप्लेमध्ये काहीच करता आलं नाही.मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर गडी बाद करत दिल्लीवर दबाव निर्माण केला. इतकं काय तर त्यानंतरच्या षटकातही झटपट गडी बाद केल्याने दिल्ली संघावर दडपण निर्माण झालं. तसेच संघाला सावरण्याची संधीच मिळाली नाही.

मोहम्मद शमीच्या स्विंग आणि सीममुळे दिल्लीचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. दिल्लीने पहिल्या पाच षटकात पाच गडी गमावले. मोहम्मद शमीने यात 4 गडी बाद केले. तर डेविड वॉर्नर धावचीत झाला.

मोहम्मद शमीने सामन्याची सुरुवातच गडी बाद करत केली. फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर डेविड वॉर्नर धावचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात रुसोला बाद केलं. शमीने त्याच्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात दोन गडी बाद केले.

मोहम्मद शमीने मनिष पांडे आणि प्रियम गर्ग यांना बाद केलं. दोघांचा झेल यष्टीमागे वृद्धिमान साहाने घेतला. खरं तर फलंदाजांन शमीचा शीम आणि स्विंग कळतच नव्हता. मोहम्मद शमीने 4 षटकात म्हणजेच 24 चेंडूत 11 धावा देत 4 गडी बाद केले.

दोनही संघाचे खेळाडू

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रोसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.