IPL 2023 : GT vs KKR | राशिद खान हॅट्रिक करत अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू!

रिंकूने हा सामना गाजवला असला तरी सुद्धा तुम्हाला माहित आहे का या सामन्यांमध्ये एका खेळाडू अशी कामगिरी केली की आहे तो असा रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

IPL 2023 : GT vs KKR | राशिद खान हॅट्रिक करत अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू!
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 1:26 AM

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये केकआरने थरारक विजय मिळवला. रिंकू सिंग याने मारलेल्या पाच सिक्सरच्या जोरावर हा सामना केकेआर ने जिंकला. आयपीएलच्या इतिहासामध्ये या सामन्याची कायम नोंद ठेवली जाईल. रिंकू या सामन्याचा हिरो ठरला, वय वर्ष 25 असलेल्या पठ्याने कोणीही असा विचार केलाही नसेल अशी कामगिरी केली. मात्र रिंकूने हा सामना गाजवला असला तरी सुद्धा तुम्हाला माहित आहे का या सामन्यांमध्ये एका खेळाडू अशी कामगिरी केली की आहे तो असा रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणारा म्हणजे राशिद खान. अफगाणिस्तानच्या या खेळाडूने 2023 च्या आयपीएल मध्ये हॅट्रिक घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट, बिग बॅश लीग, कॅरिबियन लीग आणि आता इंडियन प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेण्याचा पराक्रम राशिदने आपल्या नावावर केला आहे.

केकेआरने सामना जिंकला असता तरीसुद्धा गुजरात टायटन्सच्या राशिद खान याने सामन्याच्या हॅट्रिक घेतली. 17 व्या ओव्हरमध्ये राशिदने आपल्या पहिल्या तीन चेंडूवर केकेआरच्या तीन स्टार खेळाडूंना माघारी पाठवलं. यामध्ये आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि तिसरा शार्दुल ठाकूर यांना राशिदने आपल्या जाळ्यात अडकवलं.

राशिद खानने ही हॅट्रिक घेत सामना पूर्णपणे पालटवला होता. मात्र रिंकू सिंहने शेवटच्या ओव्हरमध्ये यश दयाळ याच्या गोलंदाजीवर 29 धावांची गरज असताना सलग पाच षटकार मारत सामना केकेआरच्या झोळीत टाकला. रिंकूने नाबाद 48 धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.