GT vs KKR | सामन्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी कॅप्टन बदलला, नक्की कारण काय?

आयपीएलच्या 16 व्या मोसमादरम्यान टीमला मोठा झटका बसला आहे. सामन्याच्या आधी अवघ्या काही मिनिटांआधी प्रकृती बिघडल्याने तडकाफडकी कर्णधारच बदलण्यात आला आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांनाही शॉक लागला.

GT vs KKR | सामन्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी कॅप्टन बदलला, नक्की कारण काय?
Gujarat Titans ipl 2023
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 4:24 PM

अहमदाबाद | आयपीएल 16 मोसमातील 13 वा सामना हा गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. गुजरातने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. गुजरातने या मोसमातील सुरुवात शानदार पद्धतीने केली आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाताने आपला सलामाची सामना गमावला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आरसीबीवर शानदार विजय मिळवला. दरम्यान गुजरात विरुद्ध कोलकाता या सामन्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे.

टीम मॅनेजमेंटने सामन्याच्या काही मिनिटांआधी ऐनवेळेस कॅप्टन बदलला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका बसला. गुजरात टायटन्सने कोलकाता विरुद्धच्या या सामन्याआधी कॅप्टन बदलला. गुजरातचा नियमित कॅप्टन हार्दिक पंड्या या सामन्यातून बाहेर झाला आहे.

टॉससाठी कोलकाता आणि गुजरातकडून दोन्ही कर्णधार मैदानात आले. कोलकाताकडून कॅप्टन नितीश राणा मैदानात आला. तर गुजरातकडून हार्दिकऐवजी राशिद खान टॉससाठी आला. यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटकाच बसला.

हे सुद्धा वाचा

आपल्या होम ग्राउंडवर आपल्या लाडक्या टीमसोबत कॅप्टन हार्दिक पंड्याचा गेम पाहण्यासाठी गुजरात टायटन्सचे चाहते उत्साही होते. मात्र राशिद जेव्हा टॉससाठी मैदानात आला, तेव्हा चाहत्यांना मजबूत झटका बसला.

नक्की कारण काय?

हार्दिकच्या जागी कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या राशिदला टॉसदरम्यान नियमित कॅप्टनबाबत विचारण्यात आलं. हार्दिकची सामन्याआधी तब्येत बिघडल्याने तो उपलब्ध नसल्याचं राशिद याने सांगितलं. तसेच हार्दिकच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये विजय शंकर दिल्याचं राशिद याने सांगितलं. त्यामुळे आता सलग 2 सामन्यात विजयी झालेली गुजरात राशिदच्या नेतृत्वात विजयी हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.