IPl 2023 Wriddhiman Saha : चाळिशीत पोहोचलेल्या वृद्धीमान साहाने मजबूत फोडत रचला इतिहास

दुपारच्या तळपत्या उन्हात चाळिशी गाठायला आलेल्या साहाने लखनऊच्या गोलंदाजांना जबर फोडलं आहे. अवघ्या 20 चेंडूत त्याने 50 धावा काढत आक्रमक खेळी केली.  43 चेंडूत 81 धावा केल्या यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 सिक्सर मारले.  

IPl 2023 Wriddhiman Saha : चाळिशीत पोहोचलेल्या वृद्धीमान साहाने मजबूत फोडत रचला इतिहास
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 5:59 PM

मुंबई : आयपीएलमधील 51 सामना गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यामध्ये लखनऊ संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. के. एल. राहुल याला दुखापत झाल्यामुळे IPL बाहेर पडला असल्याने संघाच्या कर्णधारपदाची धुरा कृणाल पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. पंड्याचा हा निर्णय गुजरात संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी चुकीचा ठरवला आहे. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला झकास सुरूवात करून दिली. या सामन्यात गुजरात संघाचा खेळाडू  वृद्धीमान साहा याने 81 धावांची आक्रमक खेळी केली.

दुपारच्या तळपत्या उन्हात चाळिशी गाठायला आलेल्या साहाने लखनऊच्या गोलंदाजांना जबर फोडलं आहे. अवघ्या 20 चेंडूत त्याने 50 धावा काढत आक्रमक खेळी केली.  43 चेंडूत 81 धावा केल्या यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 सिक्सर मारले.

वृद्धिमान साहाने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. अवघ्या 20 चेंडूत त्याने हाल्फ सेंच्युरी ठोकली. तर याआधी विजय शंकर याने 21 चेंडूत अर्धशतक मारलं होतं. साहाने शंकरला मागे सोडत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

लखनऊविरुद्धच्या या सामन्यात साहाने शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये गुजरात संघाची मोठी भागीदारी असून या हंगामातीलसुद्धा दुसरी सर्वोच्च ओपनिंग भागीदारी होती.

वृद्धिमान साहाने पहिल्याच ओव्हरपासून जोरदार फटकेबाजी केली. साहाने डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानला टार्गेट केलेलं पाहायला मिळालं होतं. एक वर्षानंतर पहिल्यांदाच तो गोलंदाजी करत होता. मोहसिनच्या एका ओव्हरमध्ये साहाने 2 चौकार आणि 2 षटकार मारले होते. शेवटच्या षटकातही त्याने मोहसीनला एक षटकार आणि एक चौकार मारला. साहाने 13 चेंडूत त्याच्याकडून 31 धावा वसुल केल्या.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणऱ्या लखनऊ संघाने 227 धावांचा डोंगर उभा केला आहे. यामध्ये वृद्धिमान साहाने 81 धावा, शुबमन गिल नाबाद 94 धावा, हार्दिक पंड्या 25 धावा आणि मिलरने 21 धावा केल्या. तर लखनऊच्या मोहसिन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.