Team India | टीम इंडियाचे 2 क्रिकेटर अपघातातून थोडक्यात बचावले, संकट टळलं
आयपीएल 16 व्या हंगामात मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचे 2 खेळाडू सुदैवाने बचावले आहेत.
मुंबई | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये मंगळवारी 25 एप्रिल रोजी 35 वा सामना हा गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. मुंबईने या हंगामात एकूण 3 तर गुजरातने 4 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. या सर्व दरम्यान क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी आणि क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत याचा रस्ते अपघात झाला होता. पंतचं दैव बलवत्तर म्हणून तो त्या अपघातातून वाचला. गाडीने पेट घेण्याआधी तो बाहेर पडला. पंत तेव्हापासून सावरतोय. मात्र पंतच्या अपघातातून टीम इंडियाच्या बाकी खेळाडूंनी धडा घेतल्याचं दिसून येत नाही. टीम इंडियाचे आणखी 2 खेळाडू अपघातातून बचावले. चिंताजनक बाब म्हणजे या दोघांनीही हेल्मेटही घातलेला नव्हता.
टीम इंडियाचे 2 युवा आणि स्टार खेळाडू सुदैवाने अपघातातून बचावले आहेत. टीम इंडियाचे इशान किशन आणि शुबमन गिल हे दोन्ही द्विशतकवीर थोडक्यात अपघातातून बचावले आहेत. हे दोघेही बॉल लागण्यापासून थोडक्यात वाचले नाहीतर मोठा अनर्थ झाला असता.
नक्की काय झालं?
इशान किशन आणि शुबमन गिल हे दोघेही मैदानात एकमेकांसह बोलत होते. दोघेही प्रॅक्टीस करण्यासाठी जात होते. या दरम्यान दुसऱ्या बाजूला सराव सुरु होता. या दोघांच्या दिशेने वेगात बॉल आला आणि जवळ पडला. इशान आणि शुबमन या दोघांनी हसता हसता दुर्लक्ष केलं. मात्र या दोघांपैकी एकाला जरी हा बॉल लागला असता तरी, काय झालं असतं याची कल्पना न केलेलीच बरी. हे दोघेही सरावासाठी जात असल्याने हेल्मेटही घातलेला नव्हता.
सिजन बॉलचा फटका हा जोरात लागतो. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युज याचाही बॅटिंगदरम्यान बॉल लागल्याने दुर्देवी मृत्यू झाला होता. ह्युजने हेल्मेट घातला होता, मात्र त्यानंतरही अनर्थ घडला. या तुलनेत शुबमन आणि इशान यांच्या जवळ तितक्या वेगात बॉल पडला नाही. पण जर चूकुन यांना बॉल लागता असता, तर या दोघांना दुखापत झाली असती.
दरम्यान या गुजरात विरुद्ध मुंबई या सामन्यात या 2 मित्रांमध्येही कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शुबमन गिल आणि इशान किशन हे दोघेही एकमेकांचा चांगले मित्र आहेत. या दोघांनी टीम इंडियासाठी वनडेत द्विशतकही ठोकलंय. या दोघांनी आतापर्यंत टीम इंडियाला आणि आयपीएलमध्ये अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. आता मंगळवारी होणाऱ्या सामन्यात हे दोघेही एकमेकांच्या संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न करतील.
व्हायरल व्हीडिओ
??-laap of friends ??@ShubmanGill | @ishankishan51 #AavaDe | #GTvMI | #TATAIPL 2023 pic.twitter.com/TjmfoNpy6G
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 24, 2023
शुबमन गिल या मोसमात सातत्याने शानदार कामगिरी करतोय. विशेष करुन शुबमनचा नरेंद्र मोदी स्टेडियममधील आकडे लक्षवेधी आणि उल्लेखनीय आहेत. गिलने या सिजनमधील 6 सामन्यात 38 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेशही आहे. तर दुसऱ्या बाजूला इशान किशन याला 7 सामन्यांमध्ये हवा तसा कारनामा करता आलेला नाही. त्यामुळे गुजरात विरुद्ध मुंबई या सामन्यात हे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.