GT vs MI | मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, गुजरातचा 55 धावांनी विजय

मुंबई इंडियन्स टीमला घरच्या मैदानात पराभूत करत गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्सनंतर अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम ठरली आहे. जाणून घ्या नक्की गुजरातने काय केलं.

GT vs MI | मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, गुजरातचा 55 धावांनी विजय
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:42 PM

गांधीनगर | गुजरात टायटन्स टीमने मुंबई इंडियन्स संघावर 55 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. गुजरातचा हा या मोसमातील एकूण पाचवा विजय ठरला. गुजरात या विजयासह 16 व्या हंगामात चेन्नईनंतर 10 पॉइंट्स पूर्ण करणारी दुसरी टीम ठरली.

मुंबईकडून नेहल वढेरा याने सर्वाधिक 40 धावा केल्या. कॅमरुन ग्रीन 33 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 23 रन्स केल्या. पियूष चावला याने 18 रन्सचं योगदान दिलं. अर्जुन तेंडुलकर आणि इशान किशन या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. रोहित शर्मा आणि टिळक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 2 धावा केल्या. टीम डेव्हिड भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. तर जेसन बेहरनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ हे दोघे नाबाद परतले. गुजरातकडून नूर अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.राशिद खान आणि मोहित शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने रोहित शर्माची एकमेव पण मोठी विकेट घेतली.

गुजरातची बॅटिंग

दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकला. गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 6 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. गिल याने 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. मिलरने अखेरच्या काही चेंडूंपर्यंत जोरदार फटकेबाजी करत 22 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. अभिनव मनोहर यानेही टॉप गिअर टाकत 21 बॉलमध्ये 42 रन्सची इनिंग केली.

तर अखेरच्या काही बॉलमध्ये राहुल तेवितिया याने 5 बॉलमध्ये 3 सिक्ससह नाबाद 20 धावा केल्या. तर विजय शंकर याने 19, कॅप्टन हार्दिक पंड्या याने 13, ऋद्धीमान साहा याने 4 आणि राशिद खाने याने 2* धावा केल्या. मुंबईकडून पियूष चावला याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, बेहरनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....