Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह इज बॅक, यॉर्कर किंगची एन्ट्री

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूडन्युज समोर आली आहे. मुंबईचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याची एन्ट्री झाली आहे.

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह इज बॅक, यॉर्कर किंगची एन्ट्री
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 8:49 PM

गांधीनगर | आयपीएल 16 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकला आहे. रोहित शर्माने गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी गूड न्यूज समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमाचा एक्का असलेला यॉर्कर किंग हा परतला आहे. जसप्रीत बुमराहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुमराह परतल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आहे.

जसप्रीत बुमराह हा टीम इंडियातून दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून दूर आहे. या दुखापतीमुळे बुमराहला टी 20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर झालेल्या अनेक स्पर्धेत सहभागी होता आलेलं नाही.इतकंच नाही, तर तो आयपीएल 16 वा हंगामातूनही बाहेर पडला. मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात बुमराह मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी तो स्टेडियममध्ये आला. एमआय फॅन्स आर्मी या ट्विटर हँडलवरुन बुमराहचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

वरचढ संघ कोण?

गुजरात टायटन्स टीमने आयपीएलमध्ये गेल्या वर्षी 15 व्या सिजनमधून पदार्पण केलं होतं. गुजरातचं यंदाचं दुसरंच वर्ष आहे. गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण 1 वेळाच आमनासामना झाला आहे. मुंबईने या एकमेव सामन्यात गुजरातवर विजय मिळवला होता.

जसप्रीत बुमराह याची उपस्थिती

दरम्यान या मोसमात आतापर्यंत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. या तिन्ही सामन्यात दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या म्हणजेच विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. यामुळे मुंबई इंडियन्स हा विक्रम कायम ठेवणार की गुजरात टायटन्स घरच्या मैदानात विजय मिळवणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.