IPL 2023 GT vs MI Live Streaming | हार्दिक पंड्या याचं मुंबई इंडियन्सला आव्हान, कोण जिंकणार?
Gujrat Titans vs Mumbai Indians Live Streaming | मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत सर्वकाही जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.
गांधीनगर | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये मंगळवारी 25 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा या मोसमातील एकूण 35 वा सामना असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा हा एकूण सातवी मॅच असणार आहे. गुजरातने 6 पैकी 4 तर मुंबईने 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरातच्या नावावर 8 आणि मुंबईच्या नावावर 6 पॉइंट्स आहेत. मुंबईला विजयाच्या हॅटट्रिकनंतर पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबईचा हा सामना जिंकून पुन्हा एकदा विनिंग ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना किती वाजता?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
सामना कुठे पाहता येणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल. तसेच सामन्याचे प्रत्येक अपडेट्स हे टीव्ही 9 मराठी या वेबसाईटवर पाहता येतील.
डिजीटल स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ सिनेमा ऐपच्या मदतीने पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.