GT vs MI IPL 2023 : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची मॅच आज गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. मागच्या सामन्यात पंजाब किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक आहे. कॅप्टन रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत मोठी रिस्क घेऊ शकतो. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यासमोर सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती. पण त्याने रोहित शर्मा सारखी रिस्क घेतली नाही.
आधी हार्दिक पंड्या आणि आता रोहित शर्मा अशा कुठल्या विचित्र परिस्थितीत अडकलेत. मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या एका ओव्हरवर नजर टाकूया. चालू सीजनमधील ती सर्वात महागडी ओव्हर होती.
तो पर्यंत मुंबईसाठी सर्वकाही ओक्के
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 15 व्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी सर्वकाही ओके होतं. पंजाबची पहिली बॅटिंग सुरु होती. मुंबईची टीम सहज मॅच जिंकेल असं वाटत होतं. पंजाबच्या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकर 16 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्यानंतर सगळ चित्रच बदलल.
दोघांनी मिळून अर्जुन तेंडुलकरला धुतलं
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरच्या हाती चेंडू सोपवला. कारण त्याने पहिल्या दोन ओव्हरमध्ये 17 रन्स देऊन 1 विकेट काढला होता. क्रीजवर पंजाबचा सॅम करन आणि हरप्रीत भाटिया होते. त्यांना एका महागड्या ओव्हरची गरज होती. दोघांनी मिळून अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी फोडून काढली.
एका ओव्हरमध्ये फिरली मॅच
अर्जुनच्या या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 3 फोर मारण्यात आले. करन आणि भाटियाने एकूण 31 धावा लुटल्या. त्यामुळे या मॅचमध्ये अर्जुनच्या बॉलिंगची इकॉनमीच बदलून गेली. त्याच्या नावावर 3 ओव्हरमध्ये 48 रन्स 1 विकेट अशा खराब रेकॉर्डची नोंद झाली. या एका ओव्हरमध्ये मॅच फिरली. मुंबईला अनुकूल सामना पंजाबच्या बाजूने झुकला.
त्यानंतर हार्दिकने रिस्क नाही घेतली
अर्जुन तेंडुलकरने 1 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. त्याआधी असाच लज्जास्पद रेकॉर्ड गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या नावावर होता. त्या मॅचनंतर यश दयाल पुन्हा मैदानात दिसला नाही. हार्दिक पंड्याने त्याला बाहेर बसवलं.
रोहित असं नाही करणार
रोहित शर्मा अर्जुनच्या बाबतीत असं करणार नाही. तो धोका पत्करेल, अर्जुनला पुन्हा संधी देईल. जेणेकरुन त्याचं खच्चीकरण होणार नाही. आत्मविश्वास कायम राहिलं. कारण ही एक ओव्हर सोडल्यास अर्जुनने आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यात चांगली बॉलिंग केलीय.