IPl 2023 : GT vs RR | राजस्थान संघाने गुजरातचा पराभव करत बदला घेतलाच, 3 विकेट्सने मिळवला विजय
राजस्थान संघाच्या 4 धावांवर 2 विकेट्स असताना संजू आणि हेटमायरच्या आक्रमक अर्धशतकीच्या खेळीवर त्यांनी विजय मिळवला आहे.
मुंबई : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघामधील सामन्यात वेस्ट इंडिजचा घातक खेळाडू शिमरॉन हेटमायरच्या आक्रमक नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल्सने 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला आहे. गुजरातन टायटन्स संघाच्या 178 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन 60 धावा आणि हेटमायर नाबाद 56 धावा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने विजय मिळवला. राजस्थान संघाने या विजयासह गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. इतकंच नाहीतर गतवर्षीच्या फायनलमधील पराभवाचा बदलाही राजस्थानने घेतला आहे.
गुजरात संघाने प्रथम फलंदाजी केली, यामध्ये डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर त्यासोबतच शुबमन गिलने 45 धावा केल्या. या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणात्याङी खेळाडूला 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे गुजरात संघाला निर्धारित 20 षटकात 177 धावाच करता आल्या होत्या.
गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरुवात एकदम खराब झाली होती. पहिल्याच ओव्हर मध्ये हार्दिक पांड्या याने यशस्वी जयस्वालला बाद करत पहिला झटका दिला होता. गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरुवात एकदम खराब झाली होती.
पहिल्याच ओव्हर मध्ये हार्दिक पांड्या याने यशस्वी जयस्वालला बाद करत पहिला झटका दिला होता. त्यानंतर मोहम्मद शमीने जोस बटलर यालाही 0 वर बाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला. दोन विकेट गेल्यानंतर सामना गुजरातच्या पारड्यात पूर्णपणे झुकला होता. त्यावेळी मैदानात संजू सॅमसन आणि देवदत्त पडिकल हे होते दोघांनी डाव सावरला मात्र देवदत्तला बाद करत गुजरातने पुन्हा एकदा सामन्यात पकड मिळवली होती.
देवदत्त आउट झाल्यानंतर रियान परागही अवघ्या 7 धावा काढून परतला. मात्र संजू सॅमसन याने 60 धावा आणि हेटमायरच्या नाबाद 56 धावांनी राजस्थानला विजय मिळवून दिला. आर अश्विन याची 10 धावांची खेळीही महत्वपूर्ण ठरली. त्यासोबतच युवा ध्रुव यानेही 18 धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (w), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल