IPL 2023 GT vs SRH : W,W,W,1,W,1 भुवनेश्वर कुमारच्या तीन चेंडूवर सलग तीन गडी तंबूत, पण तरीही हॅटट्रीक नाही कारण…
IPL 2023 GT vs SRH : गुजरात टायटन्सने हैदराबादला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं आहे. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी जबरदस्त भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारने शेवटच्या षटकात धावा रोखली.
मुंबई : आयपीएल 2023 दृष्टीकोनातून साखळी उर्वरित सामने खूपच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक सामन्यात हार जीत पाहता गुणतालिकेचं गणित पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद या सामन्याचं देखील असंच आहे. गुजरातने हा सामना जिंकला तर थेट प्लेऑफमध्ये संधी मिळणार आहे. तर सनराईजर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. या स्पर्धेत शुबमन गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.गुजरात 200 च्या पार धावा करेल असा अंदाज असताना 188 धावांवर रोखण्यात हैदराबादला यश मिळालं. या सामन्यात शेवटचं षटक भुवनेश्वर कुमारनं जबरदस्त टाकत 2 धावा दिल्या. तर 4 गडी बाद केले. सलग तीन गडी करत गुजरातला 188 धावांवर रोखलं. पण असं असून भुवनेश्वरच्या नावावर हॅटट्रीकची नोंद झाली नाही. जाणून घ्या यामागचं कारण
भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर शुभमन गिल बाद झाला. त्याचा झेल अब्दुल समदने घेतला. त्यानंतरच्या चेंडूवर राशीद खानचा झेल क्लासेननं घेतला. तिसऱ्या चेंडूवर नूर अहमदला धावचीत करण्यात भुवनेश्वर कुमारला यश आलं. चौथ्या चेंडूवर शनाकाने एक धाव घेतली आणि मोहम्मद शमी स्ट्राईकला आलाय पाचव्या चेंडूवर शमीचा झेल मार्को जानसेननं घेतला. सहाव्या चेंडूवर मोहित शर्माने एक धाव घेतली.
Eeshwaraaa… Bhuvaneshwaraaaa!! ?? pic.twitter.com/frN7UIZriP
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 15, 2023
भुवनेश्वर कुमारने सलग तीन गडी बाद करूनही त्याच्या नावावर हॅटट्रीकची नोंद झाली नाही. कारण रन आऊटसाठी गोलंदाजाला श्रेय दिलं जात नाही. त्यामुळे सलग तीन विकेट्स घेतल्या असल्या तरी तांत्रिकदृष्ट्या ती हॅटट्रीक नाही.
गुजरात टायटन्सचा डाव
गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळालं. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी केली. गुजरातने 20 षटकात 9 गडी गमवून 187 धावा केला. हैदराबादला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं आहे. हा सामना गुजरात आणि हैदराबादच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण सुरुवातीला चार गडी झटपट बाद झाल्याने हा सामना गुजरातकडे झुकला आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
गुजरात टायटन्स : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, बी साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, दसुन शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, अब्दुल समद, सनविर सिंह, मार्को जानसेन, मयंक मार्केंडे, भुवनेश्वर कुमार, फझल्लाक फारुकी, टी नटराजन.