GT vs SRH : शुबमनच्या शतकानंतरही गुजरात टायटन्सला रोखलं, हैदराबादला ‘इतक्या’ धावांचं आव्हान
गुजरातकडून शुबमन गिलने शतकी खेळी करत एक बाजू लावून धरली होती. एकवेळ 200 पेक्षा जास्त धावा होतील असं सर्वांना वाटत होतं. परंतु हैदराबाद संघाने शेवटच्या षटकांमध्ये दमदार गोलंदाजी केली.
मुंबई : गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात गुजरात 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिलने शतकी खेळी करत एक बाजू लावून धरली होती. एकवेळ 200 पेक्षा जास्त धावा होतील असं सर्वांना वाटत होतं. परंतु हैदराबाद संघाने शेवटच्या षटकांमध्ये दमदार गोलंदाजी केली.
गुजरात संघाची सुरूवात खराब झाली होती. साहाला शून्यावरच भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवलं होतं. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शुबमन गिल शतक केल्यावर 1 काढून 101 धावांवर माघारी परतला. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. तर साई सुदर्शन याने 47 धावा केल्या.
दोन्ही विकेट गेल्यावर गुजरातचे दर्जेदार फलंदाज बाकी होते. त्यामुळे धावसंख्या सहज 200 पेक्षा होईल सर्वांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी आणि टी नटराजन या त्रिमुर्तींनी गुजरात संघाच्या मोठ्या धावसंख्येला फुलस्टॉप लावला. हार्दिक पांड्या 8 धावा, डेव्हिड मिलर 7 धावा, राहुल तेवतिया 3 धावा,राशिद खान 0 धावा आणि दासुन शनाका नाबाद 9 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन