IPL 2023 GT VS SRH : गुजरात टायटन्सने हैदराबादविरुद्ध वेगळी जर्सी परिधान करण्याचं कारण काय? जाणून घ्या
IPL 2023 GT vs SRH : गुजरात टायटन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचे खेळाडू वेगळ्या जर्सीत खेळत आहे. नेहमी ब्लू जर्सी परिधान करत असलेले गुजरात टायटन्सचे खेळाडू वेगळे का दिसत आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला जाणून घेऊयात कारण
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सचे खेळाडू स्पेशल लवेंडर जर्सीमध्ये खेळताना दिसत आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वेगळी जर्सी घालण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आयपीएल स्पर्धेत वेगळी जर्सी परिधान करणारा गुजरात टायटन्स हा दुसरा संघ आहे. गेल्या अनेक आयपीएल सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हिरव्या रंगाची जर्सी एका सामन्यात परिधान करते. पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हे पाऊल उचललं आहे. पण गुजरातने लवेंडर जर्सी परिधान केल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे. यामागे नेमकं कारण काय?
गुजरात टायटन्सने लवेंडर रंगाची जर्सी का घातली आहे?
गुजरात टायटन्सने कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी लवेंडर रंगाची जर्सी परिधान केली आहे. ही जर्सी फक्त एका सिझनसाठी आहे की नाही ते स्पष्ट नाही. आरसीबी गेल्या काही सिझनपासून एका सामन्यात ग्रीन रंगाची जर्सी परिधान करते.
#TitansFAM, get ready for a new hue on the Men in Blue as we are set to don the special lavender jersey for our final home game against #SRH to raise awareness about the early detection and prevention of cancer.
We are in this together! ?#GTvSRH | #AavaDe | #TATAIPL 2023 pic.twitter.com/VYUoW8nfVj
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 13, 2023
“लवेंडर जर्सी परिधान करून, गुजरात टायटन्सला कॅन्सरविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा द्यायचा आहे. या उपक्रमाद्वारे, कॅन्सर विरुद्धच्या लढ्याबद्दल जागरुकता वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” पांड्याने फ्रेंचायझीच्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केलेल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले.
गुजरात टायटन्सचा डाव
गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळालं. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी केली. गुजरातने 20 षटकात 9 गडी गमवून 187 धावा केला. हैदराबादला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं आहे. हा सामना गुजरात आणि हैदराबादच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
गुजरात टायटन्स : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, बी साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, दसुन शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, अब्दुल समद, सनविर सिंह, मार्को जानसेन, मयंक मार्केंडे, भुवनेश्वर कुमार, फझल्लाक फारुकी, टी नटराजन.