Video : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या याने भर मैदानात केला असा गुन्हा, स्वत:च दिली कबुली
IPL 2023 GT vs RR : आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेतील गणित बदलत आहे. एका पराभवामुळे संघाचं नुकसान होत आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची चुकी महागात पडली.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेच्या जेतेपदासाठी आजी माजी क्रिकेटपटूंनी गुजरात टायटन्सला पसंती दिली आहे. मात्र अति आत्मविश्वास गुजरात टायटन्स चांगलाच नडला असल्याचं दिसून आलं आहे. जिंकलेला सामना कसा पराभवाकडे नेतो, याचं उत्तम उदाहरण गुजरात टायटन्सनं दिल आहे. कोलकात्या विरुद्धच्या सामन्यानंतर तोच कित्ता आता राजस्थान विरुद्धच्या सामन्यात गिरवला. राजस्थानची स्थिती 12 षटकापर्यंत 6 च्या धावगतीने होती. तर शेवटच्या 8 षटकात 111 धावांची आवश्यकता होती. असं असूनही राजस्थाननं बाजी मारली. अखेर कमी लेखणं चांगलंच महागात पडल्याची कबुली हार्दिक पांड्याने दिली आहे. यात हार्दिक पांड्या आघाडीवर होता.
हार्दिक पांड्याने या सामन्यात एक सोडून तीन मोठ्या चुका केल्या. गोलंदाजी, फलंदाजी आणि इतर ठिकाणी कर्णधार हार्दिक पांड्याने संघाचं नुकसान केलं. हार्दिक पांड्यामुळे जिंकलेला सामना कसा पराभवाकडे वळला, चला जाणून घेऊयात.
पांड्याला वाटलं हा सामना जिंकला
“राजस्थान रॉयल्सची धावसंख्या पॉवरप्लेमध्ये खूपच कमी होती. मुळे वाटलं की, आता आपण सामना जिंकल्यातच जमा आहे.”, अशी कबुली हार्दिक पांड्याने दिली. पण शेवटी संजू सॅमसन आणि हेडमायरने हार्दिक पांड्याचा अति आत्मविश्वासाला खिळ घातली. त्यामुळे युद्ध आणि खेळ जिथपर्यंत संपत नाही तो पर्यंत कोणतीही ढील सोडू नये. परिणामी, संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
What was the need of this Hardik Pandya bro ? pic.twitter.com/bC6AVO0Fi3
— Manan (@mananthakurr) April 17, 2023
गोलंदाजांचा योग्य वापर नाही
हार्दिक पांड्याने गोलंदाजांचा योग्य पद्धतीने वापर केला नाही. चौकार आणि षटकारांचा वर्षावर सुरु असताना हार्दित पांड्या गोलंदाजांना योग्य पद्धतीने रोटेड करू शकला नाही. मोहित शर्मान दोन षटकात 7 धावा देऊनही त्याला चेंडू सोपवला नाही. उलट डेब्यू करणाऱ्या फिरकीपटू नूर मोहम्मदला गोलंदाजी दिली. मोहित शर्मा किंवा अल्जारी जोसेफला गोलंदाजी देऊ शकला असता. पण चुकीचा निर्णयामुळे संघाला फटका बसला.
View this post on Instagram
फलंदाजीतही कमाल नाही
हार्दिक पांड्याने आयपीएल सामन्यात अजूनही हवी तशी कामगिरी करत नाही. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 19 चेंडूत 28 धावा केल्या. इतकंच काय तर सेट झाल्यानंतर चहलच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारत तंबूत परतला. त्यामुळे चांगल्या स्थितीचा फायदा उचलता आला नाही. पांड्या मैदानात टिकला असता तर कदाचित गुजरातची धावसंख्या 190 पर्यंत पोहोचली असती.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 177 धावा केल्या आणि विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं. राजस्थानने हे आव्हान 19.2 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं. संजू सॅमसनने 32 चेंडूत 60, तर शिम्रॉन हेटमायरने 26 चेंडूत 56 धावा केल्या.