IPL 2023 : जखमी असूनही ऋषभ पंतनं कशाचीही पर्वा न करता घेतला असा निर्णय, दिल्लीसाठी ठरणार संकटमोचक

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची सर्वात वाईट आहे. सलग चार सामने गमावल्याने दिल्लीची अवस्था बिकट आहे.त्यामुळे अखेर ऋषभ पंतनं संघासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 : जखमी असूनही ऋषभ पंतनं कशाचीही पर्वा न करता घेतला असा निर्णय, दिल्लीसाठी ठरणार संकटमोचक
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 9:56 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी अपघात झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ऋषभ पंत क्रिकेट मैदानापासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाची स्थिती एकदम वाईट झाली आहे. दिल्लीनं आयपीएल 2023 स्पर्धेतील सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळे पाचवा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल असं चित्र आहे. त्यामुळे आरसीबी विरुद्धचा सामना खूपच महत्ताचा ठरणार आहे. आता ही स्थिती पाहता ऋषभ पंतने संघासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यासाठी ऋषभ पंत बंगळुरुला आला आहे. दिल्लीपासून 2 हजार किमी लांब असलेल्या चिन्नास्वामी मैदानात पोहोचला आहे. इतकंच काय तर ट्रेनिंग सेशनमध्येही हजेरी लावली. ऋषभ पंतने सामन्यापूर्वी संघाचं मनोबळ वाढवलं.

ऋषभ पंत यापूर्वी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही मैदानात पोहोचला होता. पण या सामन्यात गुजरातकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊने 50 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात गुजरातने 6 गडी आणि 11 चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. तिसऱ्या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी, तर चौथ्या सामन्यात मुंबईने 6 गडी राखून पराभूत केलं.

बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबईला 8 गडी आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याने 81 धावांनी, तर लखनऊने 1 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे चौथा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 27 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापीकी बंगळुरुने 16 आणि दिल्लीने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.